Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपाड्यातून आठ बाल कामगारांची सुटका

मुंबई/प्रतिनिधी : नागपाडा येथे बॅग बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकून आठ बाल कामगारांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गु

आमदार जगतापांच्याविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करा : भाजपने केली मागणी
पायी दिंडीतील वारकर्‍यांना ओआरएस पावडरचे वाटप
उत्तराखंडमध्ये 44 कैदी एचआयव्ही बाधित

मुंबई/प्रतिनिधी : नागपाडा येथे बॅग बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकून आठ बाल कामगारांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून दोन आरोपींवर कारवाई करण्यात आली. यापूर्वी माझगाव परिसरातील दारूखाना येथील एका बॅग बनविण्याच्या कारखान्यातून 13 मुलांची सुटका करण्यात आली होती. नागपाडा येथील मदनपुरा भागातील दोन कारखान्यात ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी बॅग कारखान्याचा व्यवस्थापक हसमतुल्लाह अब्दुल माजिद मन्सुरी (20), अब्दुल रेहमान शेख (25) यांना अटक केली आहे. मुले बॅग शिवण्याचे काम करत होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते येथे काम करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. पथकाने सामाजिक संस्थेच्या मदतीने आठ मुलांची सुटका करण्यात आली. त्यांच्याकडून 10 ते 12 तास काम करून घेण्यात येत होते.

COMMENTS