Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव शहरातील गोळीबार प्रकरणी दोन्ही गटातील आठ आरोपींना अटक  

कोपरगाव शहर ः कोपरगाव शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी गुरूवारी कोपरगाव शहर व ग्रामीण पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर भर दिवसा कोपरगाव शहराती

नगर अर्बनचे बनावट सोनेतारण गाजण्याची चिन्हे ; बचाव कृती समिती आक्रमक पवित्र्यात
LokNews24 lशेतकरी विरोधी केंद्र सरकारचा निषेध
शर्मिला गोसावी यांना रमाई गौरव पुरस्कार जाहीर

कोपरगाव शहर ः कोपरगाव शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी गुरूवारी कोपरगाव शहर व ग्रामीण पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर भर दिवसा कोपरगाव शहरातील दोन गटातील पूर्व वादातून एकमेकांवर गोळीबार होऊन यात एक जण गंभीर जखमी झाल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले होते. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेताच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने व कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी आपल्या फौजफाट्यासह तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणत तपासाची चक्र वेगाने फिरवत अवघ्या काही वेळेतच दोन्ही गटातील 8 आरोपींना ताब्यात घेतले.
या विषयी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये एका गटातील नाझीम इस्लाउद्दीन शेख, एजाज अन्सार मणियार, सागर उर्फ मोद्या रामदास मंजुळ, अझर इस्लाउद्दीन शेख तर दुसर्‍या गटातील दादा मोरे, रवी बनसोडे, बाळू पगारे, अमर भोसले यांना अटक करण्यात आली आहे. कोपरगाव शहरातील गोदावरी नदी जवळील मैनगीरी सेतू जवळील श्री स्वामी समर्थ मंदिरा समोर संध्याकाळच्या 4:30 वाजण्याच्या सुमारास कोपरगाव शहरातील दोन वेगवेगळ्या गटामध्ये पूर्व वादातून आपापसात गावठी कट्टातून गोळीबार झाल्याची घटना घडली असुन या दोन्ही गटातील गोळीबार घटनेत सहभागी असलेल्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या 8 आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली असून या सर्वा विरुद्ध क्रॉस खुनाचा प्रयत्न तसेच आर्म ऍक्ट 3,25 नुसार गुन्हा दाखल केला असून त्यांनी ही हत्यारे कुठून आणि कशी आणली तसेच त्यांचे अजून साथीदार कोण आहे या विषयी पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती शिर्डी उपविभागीय पोलिस अधीक्षक शिरीष वमने यांनी दिली आहे.तर यात कोपरगाव सुभाषनगर येथील रहिवाशी तनवीर रंगरेज हा गोळीबार घटनेत जखमी झाला असून त्याला कमरेला व छातीला गोळी लागली आहे त्याच्यावर नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

COMMENTS