Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आखाती देशांत अडकलेल्यांनामायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबर्ई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू असल्याची माहिती

ईलेक्ट्राॅल बाॅण्डही फुसका बार ठरेल का ?
लोहा तालुक्यातील 12 ग्रामपंचायती अंतर्गत 14 रिक्त जागांचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर
मोदींचे राजकारण सूडाचे नव्हे लोकशाहीच्या सक्षमीकरणाचेच !

मुंबर्ई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुटकेसाठी स्वतंत्र समन्वय यंत्रणा कार्यरत असून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर या कामाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकारकडून संवेदनशीलतेने पावले उचलली जात असून विविध देशांतील भारतीयांना टप्प्याटप्प्याने परत आणले जात आहे. महाराष्ट्रातील नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी विशेष संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या माध्यमातून अनेक जण संपर्क साधत असून त्यांची माहिती संबंधित यंत्रणांकडे पाठवली जात आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक जण आखाती देशांत अडकले आहेत. या नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र दूरध्वनी सेवा सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या परराष्ट्र विभागाशी सातत्याने संपर्क ठेवला जात असून आवश्यक ती समन्वय प्रक्रिया राबवली जात आहे. प्रवाशांना टप्प्याटप्प्याने विमानसेवेच्या साहाय्याने भारतात आणले जात आहे. परदेशातील मराठी संघटनांनाही या कार्यात सहभागी करून घेण्यात आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी अडकलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे सोपवण्यात आली आहे. या संकटाच्या काळात नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी आणि कोणत्या सूचनांचे पालन करावे, याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत. सुरुवातीला राज्य सरकारने स्वतंत्रपणे व्यवस्था करण्याची तयारी दर्शवली होती; मात्र इतर राज्यांनीही अशीच भूमिका घेतल्यास समन्वयात अडचणी निर्माण होऊ शकतात, असे केंद्र सरकारने सूचित केल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. त्यामुळे सध्या केंद्राच्या नेतृत्वाखाली एकसंध प्रयत्न सुरू आहेत. दुबईसारख्या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांसाठी स्थानिक पातळीवर अन्न व इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. राज्य सरकारकडे प्राप्त होणारी प्रत्येक माहिती तातडीने केंद्राच्या परराष्ट्र विभागाला कळवली जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. एकूणच, आखाती तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी राज्य व केंद्र सरकार समन्वयाने प्रयत्न करत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. संकटाच्या या काळात संयम बाळगून अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


ड्रोन हल्ल्यात मुंबईच्या तरूणाचा मृत्यू
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीची झळ आता थेट भारतापर्यंत पोहोचली आहे. ओमानच्या मस्कत किनारपट्टीजवळ गल्फ ऑफ ओमानमध्ये एका मालवाहू तेलवाहू जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात मुंबईतील कांदिवली येथील दीक्षित सोलंकी (वय 25) याचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला इराण-इस्रायल संघर्षाशी संबंधित असल्याचे प्राथमिक संकेत मिळत असून आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरील सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

COMMENTS