मुंबई : भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त माहितीनुसार, जुलै महिन्याच्या उर्वरित कालावधीमध्ये पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मराठवाड
मुंबई : भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त माहितीनुसार, जुलै महिन्याच्या उर्वरित कालावधीमध्ये पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मराठवाड्यात पुढील काळात पेरण्यांना वेग येईल तसेच शेतकर्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊ नये म्हणून एक रुपयात पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. दि. 24 जुलै रोजी प्राप्त माहितीनुसार 1 कोटी 4 लाख 68 हजार 349 शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले असून विमा संरक्षण क्षेत्राची व्याप्ती वाढविण्याबाबत कृषी विभागाकडून प्रयत्न सुरु आहेत, असे कृषिमंत्री धनजंय मुंडे यांनी विधानपरिषदेत उत्तरात सांगितले.
मराठवाड्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने 20 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. शेतकरी हवालदिल झालेला आहे याची चौकशी करून शेतकर्यांना तत्काळ मदत करण्याची सूचना विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांनी विधानपरिषद नियम 93 अन्वये मांडली होती. त्यावरील उत्तरादाखल मंत्री मुंडे यांनी ही माहिती दिली. मंत्री मुंडे म्हणाले, महाराष्ट्रात पाऊस जून ते ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान पडत असल्याने या काळात खरीप व रब्बी पिकांच्या पैरण्या केल्या जातात. भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार राज्यात मान्सूनचे आगमन साधारणतः 7 जूनच्या दरम्यान होते. यावर्षी 11 जून रोजी कोकण विभागामध्ये मान्सूनचे आगमन झालेले आहे. दि. 25 जून पासून संपूर्ण महाराष्ट्र मान्सून पर्जन्यमानाने व्यापला आहे. राज्यात माहे जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान 207.6 मिमी असून प्रत्यक्षात 111.3 मिमी पाऊस पडला आहे (सरासरीच्या 54 टक्के), राज्यात दि.01 जून ते दि. 23 जुलै पर्यंत सरासरी पाऊस 453.1 मिमी असून प्रत्यक्ष पडलेला पाऊस 441.5 मिमी आहे (सरासरी 27.4 टक्के). मराठवाड्यात माहे जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान 134.0 मिमी असून प्रत्यक्षात 55.5 मिमी पाऊस पडला आहे (सरासरीच्या 41.4 टक्के),मराठवाड्यात दि.01 जून ते दि. 23 जुलै पर्यंत सरासरी पाऊस 272.1 मिमी असून प्रत्यक्ष पडलेला पाऊस 251.1 मिमी आहे (सरासरी 92.3 टक्के). राज्याचे सरासरी पेरणी क्षेत्र 142.02 लाख हेक्टर आहे. 23.07.2023 अखेर राज्यात 114.25 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, ती सरासरीच्या 80 टक्के आहे. गतवर्षी याच कालावधीत 127.12 लाख हे. क्षेत्रावर पेरणी झाली होती. मराठवाडा विभागाची सरासरी पेरणी क्षेत्र 48.57 लाख हेक्टर आहे. दि.23.07.2023 अखेर मराठवाड्यात 42.65 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, ती सरासरीच्या 88टक्के आहे. गतवर्षी याच कालावधीत 45.33 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.
COMMENTS