पुणे : सावित्रीबाई फुले यांच्या मूळ गावी अर्थात खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे सावित्रीबाईंचे स्मारक महाराष्ट्र शासनाकडून उभारण्यात येत आहे. हे स
पुणे : सावित्रीबाई फुले यांच्या मूळ गावी अर्थात खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे सावित्रीबाईंचे स्मारक महाराष्ट्र शासनाकडून उभारण्यात येत आहे. हे स्मारक चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचे प्रेझेंटेशन मला दाखवले असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 वा जयंती उत्सव व भारतीय स्त्री मुक्ती दिन या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आले असताना ते अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मंत्री पंकजा मुंडे , शंभूराज देसाई, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील, आदिती तटकरे आणि काही आमदार उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, नायगाव येथील प्रस्तावित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या दहा एकर जागेतील नियोजित स्मारकाच्या संदर्भात माहिती दिली. सावित्रीबाई फुले यांना साजेचे असे स्मारक महाराष्ट्र शासन उभे करणार आहे व त्या स्मारकाच्या आराखड्याचे प्रेझेंटेशन सुद्धा मी पाहिले आहे. लवकरच ते उभे राहील असेही फडणवीस म्हणाले. दरम्यान, ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याशी आपली चर्चा झाली त्यानुसार काय नेमकी चर्चा झाली असे विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे कार्य पुढे नेण्याची व समता युक्त समाज तसेच संविधान प्रेमी समाज कसा निर्माण करता येईल यासाठी काय करावे लागेल याविषयी छगन भुजबळ यांच्याशी चर्चा झाल्याचे आणि दुसरी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
COMMENTS