Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री श्री. दीपक केसरकर यांची शिक्षकांसाठी ‘टीआर’ या उपाधी ची घोषणा

नवनीतच्या ‘टीआर फॉर टीचर्स’ उपक्रमाला पाठिंबा

नाशिक प्रतिनिधी - रत्नागिरी येथे पार पडलेल्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या १७व्या अधिवेशनात महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री मा. श्री. दीपक केस

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ तूफान व्हायरल.
लढवय्या सेनानी गमावला
कडा कॉलनी परिसराला व येथील भूमीला पुण्यकर्माची ओढ

नाशिक प्रतिनिधी – रत्नागिरी येथे पार पडलेल्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या १७व्या अधिवेशनात महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री मा. श्री. दीपक केसरकर यांनी जाहीर केले की, शिक्षकांना ‘टीआर.’ ही उपाधी बहाल करण्यात येईल, जी शिक्षक आपल्या नावापुढे लावू शकतील. नवनीत एज्युकेशन लि.च्या ‘टीआर फॉर टीचर्स’ उपक्रमाचे हे यश आहे. डॉक्टर (डीआर.), कॅप्टन (सीएपीटी.), न्यायाधीश (जस्टीस) यांच्या नावामागे ज्याप्रमाणे त्यांच्या व्यवसायाला साजेशी उपाधी लावली जाते, त्याचप्रमाणे शिक्षकांच्याही नावामागे सन्मानाने ‘टीआर.’ ही उपाधी लावली जावी, यासाठी नवनीतने हा उपक्रम हाती घेतला होता. शिक्षण हा सर्वांत उदात्त आणि निःस्वार्थ व्यवसायांपैकी एक आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्यासाठी निरपेक्ष वृत्तीने अविरत झटणारे, महत्त्वपूर्ण योगदान देणारे; डॉक्टर, इंजिनिअर, न्यायाधीश यांना घडविणारे शिक्षक मात्र दुर्लक्षित राहतात.     

मंत्री पुढे असेही म्हणाले की, शिक्षकांना त्यांच्या वाहनांवर ‘टीआर’ लिहिण्याची परवानगी देण्याचा सरकार विचार करत आहे. महाराष्ट्राचे माननीय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर म्हणाले, ‘‘यामुळे शिक्षकांवरील ताण कमी होईल. आता डॉक्टरांच्या वाहनांवर ‘डीआर’ लिहितात त्याप्रमाणे शिक्षकांच्या वाहनांवर ‘टीआर’ लिहिण्याची परवानगी लवकरच दिली जाईल. कुंभार ज्याप्रमाणे मातीला आकार देतात त्याप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देतात. डॉक्टर जीवन देतात आणि शिक्षक खऱ्या अर्थाने त्या जीवनाला आकार देतात. शिक्षक वेळेवर शाळेत पोहोचावेत, यासाठी त्यांना त्यांच्या वाहनांवर ‘टीआर’ चिन्ह देण्याची योजना आहे.”

या उपक्रमाला पाठिंबा दिल्याबद्दल नवनीत मा. मंत्री आणि सरकारचे अत्यंत आभारी आहे. नवनीत एज्युकेशन लि.चे व्यवस्थापकीय संचालक, ज्ञानेश (सुनील) गाला म्हणतात, ‘‘शालेय शिक्षण हा शिक्षणाचा पाया आहे आणि शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील दीपस्तंभ आहेत, असा नवनीतचा विश्वास आहे. शिक्षकाची नोकरी ही आव्हानात्मक जबाबदारी आहे; परंतु या व्यवसायाला इतर व्यवसायांप्रमाणे प्रतिष्ठा मिळेलच असे नाही. #टीआर फॉर टीचर्स हा शिक्षकांच्या भावनेला अभिवादन करण्याचा आणि त्यांच्या उदात्त व्यवसायाला सलाम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही फक्त सुरुवात आहे आणि माननीय मंत्र्यांच्या पाठिंब्यामुळे आम्हाला आता खात्री आहे की या उपक्रमाद्वारे इतर अनेकांना या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल.

COMMENTS