Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षण हाच उन्नतीचा खरा राजमार्ग

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - डॉ. मृणाल भारद्वाज

नाशिक प्रतिनिधी - मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित धनलक्ष्मी जुनियर कॉलेजमध्ये नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयी मार्गदर्शन क

गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे ः भानुदास मुरकुटे
दौंड-मनमाड मार्गावरील बेलवंडी विसापूर मार्ग पूर्ण
संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी | LOKNews24

नाशिक प्रतिनिधी – मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित धनलक्ष्मी जुनियर कॉलेजमध्ये नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.  यावेळी लोकनेते व्यंकटराव हिरे पंचवटी कॉलेजच्या उपप्राचार्य मा. डॉ. मृणाल भारद्वाज मॅडम, मानवधन संस्थेचे संस्थापक मा. प्रकाश दादा कोल्हे. संस्था सचिव व मुख्याध्यापिका मा. सौ. ज्योती कोल्हे मॅडम, प्रा. डॉ. जयमाला सोडे ,प्रा.हर्षाली खैरनार ,सलोनी कोल्हे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

 अकरावी आणि बारावीनंतर विद्यार्थ्यांनी आपला शैक्षणिक मार्ग अचूक निवडावा म्हणून विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा विषयी माहिती असणे अत्यावश्यक असल्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांनी आपली आवड त्याचबरोबर आपल्यातील सुप्त गुण यांची ओळख करून त्यानुसार आपले पुढील शिक्षण घेऊन आपला आत्मविकास करावा या प्रमुख उद्देशाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजून देण्यात आले.   विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून  शिक्षणाचे  दृढीकरण करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची रुची तसेच आधुनिक कालावधीचा विचार करता कौशल्याधिष्ठित शिक्षणावर भर देऊन विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये आपली प्रगती साधू शकेल अशा पद्धतीच्या ठळक मुद्द्यांवर डॉक्टर मृणाल भारद्वाज मॅडम यांनी मार्गदर्शनश केले. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणातील मार्ग सुकर करण्याचे हे धोरण विद्यार्थ्यांना निश्चितच फलदायी ठरेल असा विश्वास यावेळी मुख्य वक्त्या डॉ. मृणाल भारद्वाज यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षणामध्ये संम्येक क्रांती होणे अत्यावश्यक आहे त्याचे हे पहिले पाऊल असावे असे ही मत यावेळी संस्थेचे संस्थापक यांनी व्यक्त केले. विश्वगुरू भारतासाठी आदर्श मानव घडणे अपेक्षित असल्याने हे या शैक्षणिक धोरणातून साध्य होईल असा निर्वाळाही यावेळी देण्यात आला.

या वेळी  उच्च माध्यमिक विद्यालय विभागप्रमुख प्रा. पुंजाराम खाडगिर प्रा. रत्ना आढाव यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम केले डिंपल पालवे, रीना गोसावी, शिरीन शेख इ. प्राध्यापक वर्ग यावेळी उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपणा कुलकर्णी यांनी केले तर डिंपल पालवे यांनी आभार मानले.यावेळी समस्त मानव सेवक उपस्थित होते.

COMMENTS