श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात २८ रोजी पहाटेच्या सुमारास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या स्टार्स प्रकल्पांतर्गत
श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात २८ रोजी पहाटेच्या सुमारास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या स्टार्स प्रकल्पांतर्गत संकलित मूल्यमापन – २ २०२४- २५ वर्षासाठी मराठी माध्यमाच्या गणित विषयाच्या सुमारे ५०८ प्रश्नपत्रिका दौंड – जामखेड महामार्गावर विखुरलेल्या अस्वस्थेत पडल्या होत्या. सजग नागरिकांनी सर्व प्रश्नपत्रिका गोळा करून पोलीस ठाण्यात जमा केल्या.
याबाबत अधिक माहिती अशी की विजय उंडे नेहमीप्रमाणे मित्रांसोबत पहाटे व्यायामाला चालले होते. छत्रपती महाविद्यालया समोरील जामखेड – दौंड महामार्गावर त्यांना अर्धा किलोमीटर अंतरात या प्रश्नपत्रिका विखुरलेल्या अस्वस्थेत आढळून आल्या. सर्वांनी मिळून ५०८ प्रश्नपत्रिका गोळा केल्या व पोलिस ठाण्यात जमा केल्या. यावेळी पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी पंचायत समिती शिक्षणाधिकारी सत्यजित मच्छिंद्र यांना बोलावून त्यांच्याकडे सुपूर्द केल्या. यावेळी शिक्षणाधिकारी श्री. मच्छिंद्र यांनी शिक्षण विभागाकडे अधिक चौकशी केली असता या प्रश्नपत्रिका बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पंचायत समिती शिक्षण विभागात जाणार होत्या व परीक्षेआधी तालुक्यातील शाळांमध्ये वितरित केल्या जाणार होत्या.
पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या स्टार्स प्रकल्पांतर्गत इयत्ता चौथीसाठी मराठी माध्यमाच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका होत्या. राज्य शिक्षण विभागाने शिरीष कार्गो या मालवाहतूक कंपनीकडे वितरणाचा ठेका दिला होता. या कंपनीने निष्काळजीपणा दाखविल्यामुळेच प्रश्नपत्रिका रस्त्यावर पडल्या होत्या.
COMMENTS