मुंबई ः ठाकरे गटाचे नेते आणि लोकसभेसाठी वायव्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरलेले महाविकास आघाडी उमेदवार अमोल कीर्तीकर यांना ईडीने दुसर्यांदा स
मुंबई ः ठाकरे गटाचे नेते आणि लोकसभेसाठी वायव्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरलेले महाविकास आघाडी उमेदवार अमोल कीर्तीकर यांना ईडीने दुसर्यांदा समन्स बजावले आहे. त्यांना 8 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोना काळातील खिचडी वितरणात झालेल्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी किर्तिकर यांना समन्स बजावण्यात आले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी युवासेनेचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांना कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर अमोल किर्तीकरांना ईडीने समन्स बजावले आहे. गेल्या चौकशीला अमोल किर्तीकर चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे कीर्तिकर गैरहजर असल्याची माहिती त्यावेळी वकील दिलीप साटलेंनी दिली होती. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाचे अनेक नेते ईडीच्या रडारवर असून यामुळे अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोना काळात मुंबई महानगर पालिकेकडून स्थलांतरीत परप्रांतियांना तांदूळ आणि मसूरची खिचडी तयार करुन वाटप करण्यात आले होते. 52 कंपन्यांना दिलेल्या कंत्राटानुसार चार महिन्यांत चार कोटी खिचडी पाकिटांचे वाटप करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. यात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी करत पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार प्राथमिक तपास करत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणात सहा कोटी 37 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल केला.
COMMENTS