Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नरेश गोयल यांच्या विरोधातील ‘ईडी’ ची तक्रार रद्द

मुंबई/प्रतिनिधी ः मूळ गुन्हाच अस्तित्वात नसेल तर त्याआधारे अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) नोंदवण्यात येणारी तक्रार (ईसीआयआर) कायम राहू शकत नाही

सत्ता-संघर्षावरील सुनावणी 9 महिन्यानंतर पूर्ण
जामखेडमध्ये अनोख्या विवाहाचे कौतुक
Sanjay Raut on IT Raid : अपना भी टाईम आयेगा… (Video)

मुंबई/प्रतिनिधी ः मूळ गुन्हाच अस्तित्वात नसेल तर त्याआधारे अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) नोंदवण्यात येणारी तक्रार (ईसीआयआर) कायम राहू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता यांच्या विरोधात ईडीने नोंदवलेली तक्रार रद्द केली. मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द झाल्याने ईडीचे प्रकरण टिकू शकत नाही. त्यामुळे ईडीने दाखल केलेला ‘ईसीआयआर’ आणि त्याआधारे सुरू केलेली कारवाई बेकायदा व कायद्याशी विसंगत आहे, असा दावा करून गोयल दाम्पत्याने प्रकरण रद्द करण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायामूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने झालेल्या सुनावणीच्या वेळी ती मान्य केली.

COMMENTS