Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तीस-तीस गुंतवणूक घोटाळयाची ईडी करणार चौकशी

मुख्य आरोपीच्या डायरीत आमदारांसह अनेक अधिकार्‍यांची नावे

मुंबई/प्रतिनिधी ः मराठवाड्यातील शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या 30-30 घोटाळ्याबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माहिती मागवली आहे. प्राथमिक माहितीन

राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरूच
श्रीसंत गोरा कुंभार साहित्य पुरस्कार हा जीवनातील सर्वोच्च आनंद
भाजपा ओबीसी मोर्चाचे वतीने जिल्हाधिकारी कार्यलय येथे निदर्शने l पहा LokNews24

मुंबई/प्रतिनिधी ः मराठवाड्यातील शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या 30-30 घोटाळ्याबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माहिती मागवली आहे. प्राथमिक माहितीनुसार हा घोटाळा अंदाजे 350 कोटी रुपयांचा असल्याचे सांगितले जात आहे. या घोटाळ्याचा मुख्य आरोपी असलेल्या संतोष राठोडकडे सापडलेल्या डायरीत काही राजकीय नेत्यांची नावे होती. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आरोप फेटाळले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात शेतकर्‍यांची फसवणूक करणारा तीस-तीस घोटाळा गेल्या वर्षी समोर आला होता. या प्रकरणी अधिकच्या व्याजदरासह पैशांबाबत अपेक्षाभंग झाल्याने पैठण तालुक्यातील गुंतवणूक करणार्‍या महिलेने बिडकीन पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी संतोष राठोडसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढे या गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. तपास करतांना पोलिसांना यात आरोपीकडे तीन वेगवेगळ्या डायर्‍या सापडल्या. ज्यात हा घोटाळा 350 कोटींपेक्षा अधिकचा समोर आले होते. तर याचवेळी डायरीत अनेक राजकीय नेत्यांचे नाव असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. यात काही पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे देखील नावे असल्याचे बोलले जात आहे. यातील मुख्य आरोपी संतोष राठोड अजूनही हर्सूल कारागृहात असून, त्याला जामीन मिळालेला नाही.
दानवे यांच्यासह या यादीत आणखी काही नेत्यांची नावे आहेत. ज्यात माजी पंचायत समिती सदस्य कृष्णा भानुदास चव्हाण, भाऊसाहेब तरमळे (राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष), मनोज पेरे (शिवसेना (ठाकरे गट) पैठण तालुकाध्यक्ष), राजू प्रल्हाद राठोड (शिवसेना पदाधिकारी), विजय अंबादास चव्हाण (राष्ट्रवादी नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य), चंद्रकांत राठोड (नगराध्यक्ष, सोनपेठ परभणी) यांच्यासह अनेकांची नावे आहेत. मराठवाड्यातील 30-30 घोटाळ्याचे औरंगाबादसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांतील हजारो शेतकर्‍यांना अधिकचा व्याजदर देण्याचे आमीष दाखवले. यातून संतोष राठोडने ’तीस-तीस’ योजनेत पैसे गुंतवण्यासाठी सर्वांना भरीस पाडले. बँकेत मिळणार्‍या व्याजाच्या चारपट अधिक व्याज देऊन सुरुवातील स्वतःचे मार्केटींग केले. त्यामुळे व्याज सोडा मुद्दल मिळणे देखील अवघड झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, काही राजकीय नेत्यांनी सुद्धा यात पैसे गुंतवणूक केल्याने शेतकर्‍यांनाही विश्‍वास बसला आणि उरल्या सुरल्या लोकांनी कोट्यवधी रुपये अधिकचे व्याज मिळण्याच्या अपेक्षेने गुंतवले. पण आता गेल्या आठ महिन्यांपासून व्याज सोडा मुद्दल सुद्धा मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे हजारो शेतकरी देशोधडीला लागण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

त्या डायरीत अंबादास दानवे यांचे नावही समोर – दरम्यान या डायरीत अंबादास दानवे यांचे नावही समोर आले. त्यावर प्रतिक्रिया देताना दानवे यांनी आरोप फेटाळून लावत ’त्या डायरीत माझं नाव नाही, कोणी दुसरा दानवे असेल, असे म्हटले आहे.  पोलिसांनी जप्त केलेल्या डायरीत असलेल्या गुंतवणूकदारांच्या नावाची यादी समोर आली आहे. त्यात एका मंत्र्याचा नातेवाईक, एक आमदार, एक डीवायएसपी, एक सहायक पोलीस निरीक्षक, चार पोलीस कर्मचारी, दहा शिक्षक, परभणी जिल्ह्यातील एक माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक, कन्नड तालुक्यातील एक नगरसेवक, औरंगाबाद जिल्ह्यातील दोन सरपंच (एक सरपंच पती), दोन माजी जिल्हा परिषद सदस्य, एक पंचायत समिती सदस्य, एक ग्रामपंचायत सदस्य, एक शासकीय कंत्राटदार, तीन वाळू व्यावसायिक, एक पोलीस पाटील, एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष, पाटबंधारे विभागाचा एक अधिकारी, एक बँक कर्मचारी आणि चार हॉटेल चालक यांची नावे आहेत.

काय आहे 30-30 घोटाळा? – औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील एका तरुणाने 2016 मध्ये दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर एमआयडीसीमध्ये जमिनी गेलेल्या भागात शेतकर्‍यांना गुंतवणुकीची वेगवेगळी आमिषे दाखवली. यात त्याने बिडकीन आणि परिसरातील गावांना केंद्रबिंदू बनवले. सुरुवातीला शेतकर्‍यांना महिन्याला 5 टक्क्यांनी परतावा देण्याची मार्केटिंग करणार्‍या या तरुणाने पुढे महिन्याला 25 टक्क्यांनी परतावा परत द्यायला सुरवात केली. यासाठी जवळच्या नातेवाईकांना सोबत घेत ’तीस-तीस’ नावाचा ग्रुप बनवला होता. यातून हजारो शेतकर्‍यांनी तब्बल 350 कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

COMMENTS