संजय राऊतांना पुन्हा ‘ईडी’चे समन्स

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊतांना पुन्हा ‘ईडी’चे समन्स

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी आज चौकशीला हजर राहण्याचे निर्देश

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात एकीकडे सत्तांतर नाटय सुरु असतांनाच, दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राजऊ यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पत्राच

शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू; रांगणा किल्यावरील घटना; मृत तरुण पणूंब्रे-वारुण येथील
छत्रपती शाहू महाराजांना 100 सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन
नगर शहरात ‘या’ ठिकाणी महाराजांचा १२ फुट पुतळा उभारणार | LOKNews24

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात एकीकडे सत्तांतर नाटय सुरु असतांनाच, दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राजऊ यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पत्राचाळ घोटाळाप्रकरणी समन्स बजावत मंगळवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे राऊत यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
राज्यात सत्तांतर करण्यासाठी विरोधक एकवटले आहे. या लढाईत आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या..मला अटक करा, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे. मुंबईतील 1 हजार 39 कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. याचसंदर्भातील चौकशीसाठी राऊत यांना ईडीने समन्स पाठवले आहे. उद्या म्हणजेच 28 जून रोजी सकाळी 11 वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये राऊत यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये ईडीने या प्रकरणात संजय राऊत यांच्या अलिबागमधील 8 प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीने केली होती. ईडीने यापूर्वी 11 कोटी 15 लाख 56 हजार 573 रुपयांची स्थावर मालमत्ता या प्रकरणामध्ये जप्त केली आहे. मनी लाँडरिंग कायदा 2022 अंतर्गत गोरेगावमधील पत्रावाला चाळ पुर्निविकास प्रकल्पामध्ये ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’ने केलेल्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली. ही संपत्ती ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’चे माजी निर्देशक प्रवीण राऊत यांच्या मालकीची पालघर, सफाळे, पडघा येथील जमीनींबरोबरच दादरमधील वर्षा राऊत यांचा फ्लॅट आणि अलिबामधील किहिम समुद्रकिनार्‍यावरील वर्षा राऊत ज्या संजय राऊत यांच्या पत्नी आहेत तसेच स्वप्ना पाटकर ज्या सुजित पाटकर यांच्या पत्नी आहेत, या दोघींची एकत्रित मालकी असणार्‍या जमिनीचा समावेश आहे. उत्तर भारतामधील एका 2000 हजार कोटींच्या बँक घोटाळ्यात प्रवीण राऊत यांचा सहभाग असल्याचं समोर आले आहे. या प्रकरणामध्येही दिल्ली ईडीची टीम राऊत यांची चौकशी करु शकते. यासंदर्भातील माहिती ईडीच्या अधिकार्‍यांनी दिली असली तरी सध्या पाठवण्यात आलेली नोटीस ही पत्राचाळ प्रकरणातील आहे.

माझी मान कापली तरी, झुकणार नाही : राऊत
ईडीने नोटीस बजावल्यानंतर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी या आणि मला अटक करा अशा शब्दांत आव्हान दिलं आहे. मला रोखण्यासाठी हे कारस्थान रचलं जात असून, माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही असेही ते म्हणाले आहेत. संजय राऊतांनी यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टॅग केले आहे. ईडीने संजय राऊत यांनी पत्राचाळ प्रकरणी समन्स बजावले असून मंगळवारी हजर राहण्यास सांगितले आहे.

COMMENTS