नवी दिल्ली प्रतिनिधी - दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता अंमलबजावणी संचालनालयाने मुख्यमंत्री अरविंद केजर
नवी दिल्ली प्रतिनिधी – दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता अंमलबजावणी संचालनालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये त्यांना 2 नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यापूर्वी सीबीआयने एप्रिल महिन्यात मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी बोलावले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या नवीन मद्य घोटाळा प्रकरणीसंदर्भात ईडी केजरीवाल यांची चौकशी करणार आहे. मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की, आम आदमी पार्टीला नष्ट करण्याचा हा केंद्र सरकारचा डाव आहे. केंद्र यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. सरकार अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही मार्गाने खोटे केस उभे करून बंदिस्त करायचे आहे आणि आम आदमी पार्टीला नष्ट करायचे आहे. भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटले आहे की, आज दिल्लीकरांच्या जीवनातील दसरा दिवस आहे जेव्हा सत्याचा विजय झाला आणि लवकरच दिल्लीला अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्ट राजवटीतून मुक्तता मिळेल. दिल्ली भाजप अध्यक्षांनी अरविंद केजरीवाल यांना ईडीच्या समन्सचे स्वागत केले असून हा सत्याच्या विजयाचा दिवस असल्याचे म्हटले आहे.
COMMENTS