मुंबई/प्रतिनिधी : शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे साडेतीन नेते लवकरच तुरुंगात जातील, याची पोलखोल करण्यासाठी राऊत पत्रकार परिषद घेण्याअगोदरच मंगळव
मुंबई/प्रतिनिधी : शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे साडेतीन नेते लवकरच तुरुंगात जातील, याची पोलखोल करण्यासाठी राऊत पत्रकार परिषद घेण्याअगोदरच मंगळवारी सकाळी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने मुंबईत विविध ठिकाणी छापेमारी केली. 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी फरार असणारा अबू तब्बल 29 वर्षानंतर यंत्रणांच्या हाती लागल्यानंतर ईडीने ही कारवाई केली. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील एका मंत्र्यांचा देखील यात हात असल्याचा संशय ईडीला असल्यामुळे ईडीने त्या मंत्र्याची देखील चौकशी केली. हवाला प्रकरणी या मंत्र्यांची ईडीकडून चौकशीही करण्यात आली आहे.
1980 च्या दशकामध्ये भारत सोडून पळ काढणार्या दाऊद इब्राहिम परदेशात बसून देशामध्ये मोठे आर्थिक व्यवहार करतो असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे. मुंबईमधील डी कंपनीचा संबंध पंजाबपर्यंत असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. या पंजाब कनेक्शनमुळे पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडून अंडरवर्ल्डचा वापर पंजाबमध्ये दहशत पसरवण्यासाठी केला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. या महिन्याच्या सुरुवातीलाच तपास यंत्रणांनी अबू बकारला अटक केलीय. 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी फरार असणारा अबू तब्बल 29 वर्षानंतर यंत्रणांच्या हाती लागला असून तो दाऊदचा जवळचा सहकारी आहे. अबूला संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएईमधून अटक करण्यात आलीय. मुंबई पोलीस खात्यात काम करणार्या कर्मचार्याचा मुलगा असणारा दाऊत इब्राहिमने डोंगरीमधून आपल्या गुन्हेगारी क्षेत्रातील हलचालींना सुरुवात केली. डोंगरीमध्ये त्याची ओळख हाजी मस्तानच्या गँगशी झाली आणि तिथूनच मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातील गँग वॉरचा कालावधी सुरु झाला. 1980 दरम्यान दाऊदला एका चोरी प्रकरणी अटक करण्यात आलेली. नंतर त्याच्यावरील गुन्ह्यांची संख्या वाढतच गेली. हाजी मस्तान आणि पठाण गँगदरम्यानच्या वादामुळे दिवसोंदिवस दाऊद अधिक धोकादायक झाला. पठाण गँगमध्ये प्रामुख्याने अफगाणिस्तानमधून आलेल्या लोकांचा समावेश होता. नंतर याच गँगवॉरमधून आणि वादामधून मुंबईवर आपली दहशत निर्माण व्हावी या हेतूने दाऊदने मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा संशय ईडीला असल्यामुळे त्या दृष्टीकोनातून ईडीने तपास सुरू केला आहे.
COMMENTS