Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशद्रोह्यांना वठणीवर आणण्यासाठी आर्थिक बहिष्कार प्रभावी : शरद पोंक्षे

।संगमनेर : काही माणसं देशात राहुन, देशाचे अन्न खाऊनही भारतालाच आव्हान देऊ पाहत आहेत. त्यांना नामोहरम करण्याची जबाबदारी जागरुक भारतीय म्हणून आपल्य

अवैध धंदे चालकांना लातूर पोलिसांचा बसला जोरदार दणका
सोमठाणा गावच्या चेअरमन पदी बिनविरोध मारोती पांडुरंग कदम पांडे तर व्हाईस चेअरमन पदी नामदेव शंकरराव पा. शिंदे
भाविक भक्तांच्या स्वागतासाठी साईबाबा संस्थान सज्ज!
image.jpg

।संगमनेर : काही माणसं देशात राहुन, देशाचे अन्न खाऊनही भारतालाच आव्हान देऊ पाहत आहेत. त्यांना नामोहरम करण्याची जबाबदारी जागरुक भारतीय म्हणून आपल्या सर्वांची आहे. अशाप्रकारच्या  देशविघातक प्रवृत्तींना वठणीवर आणण्यासाठी त्यांच्यावर आर्थिक बहिष्कारासारख्या प्रभावी शस्त्राचा वापर करण्याची नितांत गरज निर्माण झाल्याचे प्रतिपादन अभिनेते, व्याख्याते शरद पोंक्षे यांनी केले.

      राजस्थान युवक मंडळाने उद्योगपती स्वर्गीय माधवलाल मालपाणी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या त्रिदिन व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प गुंफताना ते बोलत होते. ‘भारत : काल, आज आणि उद्या’ विषयावरील आपल्या दोन तासांच्या व्याख्यानात त्यांनी देशाच्या भूतकाळापासून भविष्यापर्यंतचा अभ्यासपूर्ण धांडोळा घेतला.

      आपल्या व्याख्यानात पुढे बोलताना पोंक्षे म्हणाले की, भारत स्वतंत्र होवून साडेसात दशकांचा काळ उलटला. मात्र आजही आपल्या शिक्षणपद्धतीवर ब्रिटीशांची छाप असल्याचे दिसून येते. जो पर्यंत ही शिक्षणपद्धती बदलली जात नाही, तो पर्यंत देशाला गतवैभव प्राप्त होवू शकत नाही. देशात ब्रिटीशांचा अंमल सुरु होण्यापूर्वी आपल्याकडे ‘गुरुकुल’ शिक्षण पद्धती सुरु होती. बारा वर्षांच्या या व्यवस्थेतून शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही गोष्टींसह घडणारा प्रत्येक विद्यार्थी प्रखर बुद्धिमान आणि राष्ट्रभक्त असतं. आपले त्यावेळचे ऋषीमुनी म्हणजे तत्कालीन वैज्ञानिकच होते असेही पोंक्षेनी यावेळी सांगितले.

      प्राचीन काळापासून अव्याहत असलेली देशातील गुरुकुल शिक्षण पद्धती कायम राहीली तर, इंग्रजांना भारतावर कधीच राज्य करता येणार नाही हे ताडल्यानंतर महाराणीने लॉर्ड मेकॉले याच्या माध्यमातून आपली शिक्षणपद्धत मोडीत काढली. त्यातून लादल्या गेलेल्या ब्रिटीश शिक्षण पद्धतीतून केवळ गुलाम आणि पराभूत मानसिकतेची पिढी निर्माण होत गेली. आपल्याला शिकवण्यात आलेल्या इतिहासात आक्रमकांचा उदोउदो केला गेला. जगातील सर्वोत्तम असलेल्या संस्कृत भाषेला संपविण्याचे षडयंत्र राबवले गेले. या सर्व प्रकारातून आपल्या देशाचे अतोनात नुकसान झाल्याचे पोंक्षे यांनी काही उदाहरणांसह पटवून दिले.

 संगमनेरसारख्या छोट्या शहरात राष्ट्रभक्तिने ओतप्रोत रसिकांच्या सानिध्यात झालेली त्रिदिन व्याख्यानमालासदैव स्मरणात राहील असे गौरवोद्गारही त्यांनी शेवटी व्यक्त केले.

COMMENTS