Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटीच्या संपप्रश्‍नी खा. शरद पवार यांची मध्यस्थी?

मुंबई / प्रतिनिधी : एसटी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून संपावर गेले आहेत. त्यासंदर्भात आता राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार आणि परिवहन मंत्र

15 हजारची लाच स्विकारल्या प्रकरणी गटविकास अधिकार्‍यासह शिक्षकास अटक
कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍यांचा धक्कादायक निकाल
साहेब टाळा कधी उघडणार …?

मुंबई / प्रतिनिधी : एसटी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून संपावर गेले आहेत. त्यासंदर्भात आता राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची वरळीतील नेहरू सेंटर येथे बैठक सुरू आहे. मात्र, बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. अद्यापही एसटी संपावर तोडगा निघाला नसल्याने बैठक सुरू आहे. त्यामुळे आता खा. शरद पवार यांनी पुढाकार घेतला असून आता एसटी संपाबाबत मोठा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. खा. शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर संपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
एसटीचे कर्मचारी संपावर जावून दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. तरीही एसटीचे कर्मचारी आपल्या मागण्यांवर आजही ठाम आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण करावे, अशी एसटी कर्मचार्‍यांची प्रमुख मागणी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अभ्यास करण्यासाठी एक समिती बनवण्यात आली आहे. सध्या एसटी कर्मचार्‍यांचे विलनीकरण शक्य नाही, असे राज्य सरकारने सांगितले आहे. अनेक एसटी कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अनेकांना सेवा समाप्ती करू, असा इशाराही सरकारने दिला आहे.
मात्र, एसटी कर्मचारी आपल्या संपाबाबत ठाम आहेत. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत असून खासगी वाहन धारकांकडून प्रवाशांची लूट होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी खा. शरद पवार यांनी यामध्ये उडी घेतली आहे. त्यांची परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत वरळीतील नेहरू सेंटर येथे बैठक सुरू आहे. यामध्ये एसटी संपाबाबत चर्चा केला जात असून मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. आता एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर तोडगा निघतो का? यावर राज्याच्या दळण-वळणाचा प्रश्‍न सुटणार आहे.

COMMENTS