Homeताज्या बातम्यादेश

खा. नीलेश लंकेंनी लोकसभेत घेतली इंग्रजीतून शपथ

नवी दिल्ली ः अहमदनगर लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे यांनी इंग्रजी भाषेचा मुद्दा पुढे आणला होता. संसदेत तुमचे प्रश्‍न मांडण्यासाठी आणि तेथील कामका

खासदार लंके यांचे निवडणूक निधी देणार्‍यांसाठीच आंदोलन ?
खासदार नीलेश लंकेंना आत्ताच उपरती का ?
खासदार लंके यांचा शेवगावात संविधान देऊन सन्मान

नवी दिल्ली ः अहमदनगर लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे यांनी इंग्रजी भाषेचा मुद्दा पुढे आणला होता. संसदेत तुमचे प्रश्‍न मांडण्यासाठी आणि तेथील कामकाज समजून घेण्यासाठी इंग्रजी भाषा जाणणारा उमेदवाराला निवडून देण्याची मागणी विखे यांनी केली होती. तसेच मी इंग्रजीतून भाषण केले, ते नीलेश लंके यांनी पाठांतर करून नंतर सभेत इंग्रजीतून भाषण करून दाखवावे, असे आव्हान माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी नीलेश लंके यांना दिले होते. त्याला प्रत्युत्तर देत नीलेश लंके यांनी खासदारपदाची शपथ इंग्रजीमध्ये घेतली. यामुळे त्यांनी एकप्रकारे अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. अहमदनगर मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारात नीलेश लंके यांच्या शिक्षणावरून त्यांना विरोधकांनी हिणवले होते. त्यात सुजय विखे पाटील यांनी भाषणात नीलेश लंके इंग्रजीतून कसे बोलणार, त्यांना इंग्रजी येते का असा सवाल उपस्थित करत त्यांची खिल्ली उडवली होती. मात्र नीलेश लंकेंनी इंग्रजी भाषेत घेतलेली शपथ सध्या चर्चेचा मुद्दा बनली आहे. सभागृहात खासदारांचा शपथविधी होत असताना नीलेश लंके यांचे नाव पुकारले. तेव्हा नीलेश लंके यांनी चक्क इंग्रजीतून शपथेला सुरुवात केली त्यामुळे अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर लंके यांनी शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि रामकृष्ण हरी म्हणत हात जोडले

COMMENTS