राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. नाशिकजवळ 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. तर दुसरीकडे पालघरमध्

राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. नाशिकजवळ 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. तर दुसरीकडे पालघरमध्येही भूकंपाचा हादरा बसला. पहाटे 4 वाजून 4 मिनिटांनी याठिकाणी भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. भूकंपाच्या धक्क्याने पालघर पुन्हा हादरलं आहे. भूकंपाच्या तीव्रतेची 3.4 रिश्टर स्केल इतकी नोंद झाली आहे. पालघरमधील डहाणू तलासरी तालुक्यात भूकंपाचा हादरा जाणवला आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले.
या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही. याशिवाय मंगळवारी लडाखच्या कारगिल जिल्ह्यातही ४.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.
COMMENTS