शिवसेनेत भूकंप ; सरकार कोसळणार ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेत भूकंप ; सरकार कोसळणार ?

एकनाथ शिंदे यांच्यासह 33 आमदारांचे बंड ; काँगे्रसचे 5 आमदार नॉट रिचेबल

मुंबई/प्रतिनिधी :विधानपरिषद निवडणूक निकालाची हाती आल्यानंतर काही तासांतच राज्यात मोठी राजकीय घडामोड घडतांना दिसून येत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे य

बंडा तात्यांची जीभ पुन्हा घसरली ! l LOKNews24
माझी वसुंधरा अभियांना मध्ये दहिवडी नगरपंचायत राज्यात दुसर्‍या क्रमांकाची झेप
कोरोना काळात अंगणवाडी सेविका-मदतनीस यांचे काम प्रशंसनीय : पालकमंत्री

मुंबई/प्रतिनिधी :विधानपरिषद निवडणूक निकालाची हाती आल्यानंतर काही तासांतच राज्यात मोठी राजकीय घडामोड घडतांना दिसून येत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेत 33 आमदारांना घेऊन ते गुजरातमधील सुरतमध्ये दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे काँगे्रसचे 5 आमदार नॉट रिचेबल नसल्यामुळे महाविकास आघाडीला हा मोठा धक्का असून, यामुळे राज्यात सत्तांतर होणार असल्याचे बोलले जात आहे.
मंगळवारची सकाळ महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडवून देणारी ठरली. यामध्ये शिंदे यांनी 33 आमदारांना घेऊन बंड केले, तर दुसरीकडे काँगे्रसमधील 10 आमदार बंडाच्या पावित्र्यात असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना या आमदारांचे मन वळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शिवसेनेचे शिष्टमंडळाने शिंदे यांची भेट घेतली. मात्र शिंदे यांनी आपली राजकीय भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाही. मात्र शिंदे यांनी शिवसेनेकडे 3 प्रस्ताव दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक तथा शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांना फोन केला आहे. त्यांच्यामध्ये जवळपास 5 ते 10 मिनिटे बातचित झाली आहे. नार्वेकरांशी फोनवर बोलताना एकनाथ शिंदे यांनी चर्चेची तयारी दाखवली आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झाल्यावर मिलिंद नार्वेकर आणि ठाण्यातील विधान परिषदेचे आमदार, शिंदेंचे अतिशय विश्‍वासू आणि मर्जीतले रविंद्र फाटक हे सूरतच्या दिशेने रवाना झाले आहेत.
सध्या एकनाथ शिंदे यांच्या बरोबर 20 आमदार असल्याची माहिती कळतीये. अशा परिस्थितीत जर शिंदेंनी आपल्या समर्थक आमदारांसहित सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेतली तर ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ होऊ शकते किंबहुना सरकार कोसळू शकते. पण शिंदे यांच्या पाठीमागे सध्या 20 आमदारांचंच बळ आहे. दोन तृतीयांश आमदार दुसर्‍या पक्षात गेले, तर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. म्हणजेच एकनाथ शिंदे यांना भाजप बरोबर जाण्याच्या निर्णयाआधी किंवा सेनेला धक्का देण्याआधी आणखी 17 आमदारांची गरज आहे. म्हणजेच आमदार शिंदे यांच्या पाठीमागे 37 आमदारांचं पाठबळ लागेल. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या 20 आमदार आहेत. आम्ही शिवसेनेतच आहोत. परंतु काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतच सरकार आम्हाला मान्य नाही, अशी त्यांची भूमिका आहे. अशावेळी ठाकरे सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन केलं जावं, असा निरोप शिंदे समर्थकांनी शिवसेना नेतृत्वाला दिला आहे. परंतु हा निरोप जर शिवसेना नेतृत्वाने मान्य केला नाही एकनाथ शिंदे वेगळी भूमिका घेऊ शकतात. अशावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत फक्त 20 आमदार असून चालणार नाही तर शिंदेकडे आणखी 17 आमदार असणं आवश्यक आहे तरच ते पक्षांतर बंदीच्या कचाट्याचून वाचू शकतात. सध्या सेनेकडे 55 आमदार आहेत. दोन तृतीयांश आमदार दुसर्‍या पक्षात गेले, तर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. म्हणजेच सेनेच्या 37 आमदारांनी काही वेगळा निर्णय घेतला तर त्यांच्याविरोधात पक्षांतर बंदीचा कायदा लागू होणार नाही.

शिंदेनी दिले तीन प्रस्ताव
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला असून महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. काही तास नॉट रिचेबल राहिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीन प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे.शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडावी आणि भाजपासोबत सरकार स्थापन करावे, असा पहिला प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. तर आगामी नवीन सरकारमध्ये भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील, असा दुसरा प्रस्ताव आहे. उपमुख्यमंत्रीपद मिळालं तरच एकनाथ शिंदे गट शिवसेनेत राहील, असे तीन प्रस्ताव दिले आहेत. तर शिवसेनेने शिंदे यांचे तिन्ही प्रस्ताव फेटाळल्याचे समोर आले आहे.

अमित शहा, फडणवीस यांनी घेतली शिंदे यांची भेट
एकनाथ शिंदे आपल्या सोबतच्या आमदारांसह सुरतला पोहचल्यानंतर दिल्लीत देखील मोठया राजकीय हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादमध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस देखील होते. शिवसेनेने शिंदे यांचा प्रस्ताव अमान्य केल्यानंतर राज्यात आता सरकार कसे स्थापन करायचे, शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, यासर्व बाबींचा आणि तांत्रिक बाबींचा आढावा शहा आणि फडणवीस यांनी घेतल्याचे समजते.

शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवले
एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेते होते. मात्र त्यांनी बंड पुकारल्यामुळे शिंदे यांना गटनेते पदावरून हटवण्यात आले असून, शिवसेनेचे आमदार विकास चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तुम्ही मुख्यमंत्री व्हा, मी राजीनामा देतो : उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना नवी ऑफर दिली आहे. भाजपला सत्तेत आणण्यापेक्षा आणि तुम्ही उपमुख्यमंत्री होण्यापेक्षा तुम्ही परत फिरा. मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो, तुम्ही मुख्यमंत्री व्हा, मात्र भाजपसोबत जाऊ नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना केले आहे. मात्र शिंदे यांनी अजून या ऑफरवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

राज्यात लागू शकते राष्ट्रपती राजवट ?
एकनाथ शिंदे यांनी जर आपल्यासोबतच्या बंडखोर आमदारांसोबत राज्यपालांची भेट वेगळया अशा गटाची नोंद केली आणि शिवसेनचा पाठिंबा काढून घेतला, तर राज्यपाल राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करू शकतात. आणि राष्ट्रपती राजवट मंगळवारी रात्री लागू शकते, असा अंदाज राजकीय विश्‍लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. जर राष्ट्रपती राजवट लागू झाली, तर पुन्हा फडणवीस-शिंदे सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात, त्यानंतर पुन्हा राष्ट्रपती राजवट हटवून नवीन सरकार राज्यात ये शकते.

COMMENTS