Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ई-पीक पाहणी; सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी हैराण!

चाकूर प्रतिनिधी - मागील दोन महिन्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांसमोर ई-पीक पाहणीचे नवीन संकट उभे ठाकले आहे. ‘माझी शेती, माझा सा

आंतरराष्ट्रीय मल्ल घडविण्याचा प्रयत्न : आ. जयंत पाटील
लिंबागणेश पंचक्रोशीतील  पोखरी, बेलगाव , सोमनाथवाडी, पिंपरनई  नुकसानग्रस्त भागाची पाहणी
किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणूकीचे वारे; राष्ट्रवादीच्या आमदारासह जिल्हा बँकेच्या अध्यक्षांचा अर्ज बाद

चाकूर प्रतिनिधी – मागील दोन महिन्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांसमोर ई-पीक पाहणीचे नवीन संकट उभे ठाकले आहे. ‘माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा’ या उपक्रमांतर्गत ई-पीक पाहणी या स्वतंत्र प्लिकेशनची निर्मिती केली आहे. त्यातच नोंदणीचे संकेतस्थळ सुरळीत चालत नसल्याने शेतकर्‍यांना अडचणी येत आहेत. परिणामी, चाकूर तालुक्यातील 47 हजार शेतकरी पीकपेरा नोंदणीच्या प्रतीक्षेत आहेत.
चाकूर तालुक्यात खरिपाची पेरणी 57 हजार 938 हेक्टर्सवर झाली आहे. त्यात 47 हजार 109 शेतकरी आहेत. पेरा केलेल्या पिकाची ई-पीक पाहणी नोंदणी करणे हे राज्य सरकारने बंधनकारक केले आहे. ही नोंदणी करण्यासाठी 30 ऑगस्टची अंतिम तारीख जाहीर केली आहे. पाहणी नोंदणी न केल्यास पीक विमा, शासकीय अनुदान, पंतप्रधान सन्मान निधी तसेच राज्य सरकारच्या नमो किसान योजनाचा लाभ मिळणार नाही, असे असल्याने शेतकरी ई-पीक पाहणी करण्यावर भर देत आहेत. ज्या शेतकर्‍यांकडे अँड्रॉइड मोबाइल आहेत, त्यांना नोंदणी करता येणार आहे. परंतु, ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाइल नाही अशा शेतकर्‍यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पेरणी करून दोन महिने झाले असून, पावसाचा खंड पडल्याने खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. त्यातच ई-पीक पाहणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे ई-पीकपेरा करण्यासाठी शेतकरी प्राधान्य देत आहेत. मात्र, साइटवर वारंवार व्यत्यय येत असून, सर्व्हर काम करत नसल्याचे चित्र आहे. संबंधित साइटवर अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे या विभागांची नावे आहेत. परंतु, औरंगाबाद विभाग ओपन केला तर त्यात लातूर जिल्हा सुरू होत नाही. अधिक वेळ प्रयत्न केल्यास ओटीपी येतो. मात्र, पुढील प्रक्रिया होत नाही. शिवाय शेतशिवारांत इंटरनेटची समस्या असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. पूर्वी पीकपेरा हा तलाठी करत असे. तशीच पद्धत राहावी, अशी मागणी यामुळे समोर येत असून, पीक पाहणीला मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. मागील आठ दिवसांपासून ई-पीक पाहणी करत आहे. मात्र, साइटवर लोड असल्याने वारंवार व्यत्यय येत आहे. कधी साइट सुरू झालीच तर ओटीपी येतो. त्यानंतर पुढील प्रक्रिया होत नाही. शासनाने कृषी आणि महसूल विभागाकडून ई-पीक पाहणी करून घ्यावी. पावसाने दडी मारल्याने पिके हातातून जात आहेत. त्यामुळे नोंदणीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी समीर पाटील, विलास देशमाने यांनी केली आहे. खरीप हंगामातील पिकांची शेतकर्‍यांना ई-पीक पाहणी नोंदणी ऑनलाइन करायची आहे. यासाठी मोबाइल पही उपलब्ध करून देण्यात आले आहे. सध्या साइटच्या अडचणी येत असल्याच्या तालुक्यातील शेतकर्‍यांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यातून निश्चितच मार्ग काढण्यात येणार असून, वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे चाकूरचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी सांगितले.

COMMENTS