Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

E – २० परिषद – नाशिक जिल्हा परिषदेचा शिक्षण उत्सव

नाशिक जिल्हा परिषद व एलएफई संस्थेचा पुढाकार

नाशिक : जिल्हा परिषद व लीडरशिप फॉर इक्विटी (एलएफई) संस्थेच्या वतीने नाशिक जिल्ह्याच्या शैक्षणिक धोरणाबद्दल E – २० परिषद नाशिक जिल्हा परिषदेचा शिक

पतीने पत्नीला ढकलले ट्रेनखाली.
कशेडी घाटात कोसळली दरड; 75 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले.
आई कुठे काय करते’ या मालिकेतील अभिनेत्री राधिका देशपांडेने नवीन बिझनेस सुरू

नाशिक : जिल्हा परिषद व लीडरशिप फॉर इक्विटी (एलएफई) संस्थेच्या वतीने नाशिक जिल्ह्याच्या शैक्षणिक धोरणाबद्दल E – २० परिषद नाशिक जिल्हा परिषदेचा शिक्षण उत्सव कार्याक्रमचे आयोजन नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टर येथे करण्यात आले होते. या परिषदेत नाशिक जिल्ह्यातील यावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, शिक्षण तज्ञ सचिन जोशी, शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, एलएफई संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दामिनी माइनकर, संचालक साईप्रसाद साळे, बिलिफ संस्थेचे अतुल गायकवाड, उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, शिक्षण क्षेत्रातील होणारे बदल यांचा लेखाजोखा मांडत नाशिक जिल्हा परिषद व लीडरशिप फॉर इक्विटी संस्थेच्या वतीने E – २० परिषद व शिक्षण उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या उपक्रमांबद्दल माहिती देत भविष्यवेधी शिक्षणाच्या दृष्टीने काम करण्यासाठी शिक्षण उत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. 

शिक्षण तज्ञ सचिन जोशी यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी व पर्यवेक्षण यंत्रणेची भूमिका आणि जबाबदारी या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तंत्रज्ञानावर आधारित  शिक्षणावर भर देण्यात आला आहे त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी ही वाढली आहे, असे प्रतिपादन करत नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले.

बिलिफ संस्थेचे अतुल गायकवाड यांनी निपुण भारत अभियानायाबद्दल माहिती दिली. नवीन शैक्षणिक धोरणामधून निपुण भारत अभियानाचा जन्म झाला असल्याचे सांगत नवीन केंद्र प्रमुखांनी निपुण भारत अभियानात समाविष्ठ कार्यपद्धतीचा अवलंब करणाऱ्या शाळांना निपुण भारत शाळा म्हणून घोषणा करावी, त्याचबरोबर मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान या गोष्टींवर अध्यापन प्रक्रियेत भर द्यावा असे प्रतिपादन केले.

यावेळी शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या शिक्षक, अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्या संकल्पनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते करण्यात आले, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रदर्शनात मांडलेल्या संकल्पना जाणून घेतल्या. यावेळी शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या शिक्षक, अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचा गौरव करण्यात आला.

यांचा झाला गौरव – 

अंगणवाडी पर्यवेक्षिका – श्वेता गडाख, सुखदा पराशरे,

शिक्षक – दत्तात्रय शिंपी, कुंदा बच्छाव, भारती पवार, प्रतिभा पाटील, अशा बढे, माधव इंगळे, ज्योती अहिरे, नौशाद अब्बास मुसलमान, प्रकाश चव्हाण, वंदना भामरे,राजू घोटेकर, प्रवीण पाटील, सोनाली पाटील, संदीप गीते, चित्रा देवरे

शिक्षण विस्तार अधिकारी – भाऊसाहेब सरक, प्रमिला शेंडगे

शिक्षणाधिकारी – प्रमोद चिंचले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा शिरोरे यांनी केले तर एलएफई संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दामिनी माइनकर यांनी आभार मानले.

COMMENTS