Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वसुंधरेचे संरक्षण नागरिकांचे कर्तव्य : डॉ. सिद्दिकी

श्रीरामपूर : अलीकडच्या काळात पर्यावरण संतुलन ढासळले असून शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी मिळण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करणे गरजेचे आहे, तस

संगमनेर बाजार समितीच्या सभापतीपदी शंकरराव खेमनर
पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
रक्षकच झाला भक्षक…पोलिसावर अत्याचाराचा गुन्हा

श्रीरामपूर : अलीकडच्या काळात पर्यावरण संतुलन ढासळले असून शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी मिळण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करणे गरजेचे आहे, तसेच वसुंधरेचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, अशी अपेक्षा प्राचार्य डॉ. ए. एन. सिद्दिकी यांनी केले.
नगर तालुक्यातील जेऊर येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री संतुकनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने नुकतेच पर्यावरण संवर्धन आणि वृक्षवाटपाचा कार्यक्रम जेऊर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे नियोजन पर्यावरण प्रेमी प्राचार्य डॉ. ए. एन. सिद्दिकी यांच्या मार्गदर्शनाखाली जेऊर येथील आठवडा बाजारात करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. सिद्दिकी यांनी पर्यावरण संवर्धन आणि वसुंधरा संरक्षणाविषयी विद्यार्थी आणि ग्रामस्थांशी संवाद साधून भेट दिलेल्या रोपांचे आपल्या परिसरात रोपण करून त्याचे संरक्षण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी इयत्ता बारावी वर्गातील विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून आठवडे बाजारात पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. सिद्दिकी यांच्यावतीने व हस्ते आठवडे बाजारातील ग्रामस्थांना वड, पिंपळ, चिंच, करंजी, आवळा सरबत आदी वृक्षांचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यालयातील शिक्षकांसह जेऊर गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS