Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराड आगारातील चालकाचा हृदय विकाराने मृत्यू

कराड / प्रतिनिधी : कराड एसटी आगारातील उपोषणात सहभागी एका बस चालकाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील आटके येथील बाळकृष्ण बापूसो पाटील (वय 42) यांचा ह

Osmanabad: मांजरा नदी मध्ये 17 जण अडकले
गृहपाठ न केल्यामुळे पडळकर-खोत तोंडघशी : राजू शेट्टी
माण तालुक्यात अवैध वाळू उपसा; 17 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त

कराड / प्रतिनिधी : कराड एसटी आगारातील उपोषणात सहभागी एका बस चालकाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील आटके येथील बाळकृष्ण बापूसो पाटील (वय 42) यांचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. एसटी बस कर्मचार्‍यांच्या संपात चालक सहभागी होते. त्यामुळे विलीनीकरणाच्या मुद्यावरून निर्णय होत नसल्याने चिंतेत होते.
मिळालेली मिळालेली माहिती अशी की, कराड आगारातील बसचालक बाळासाहेब पाटील यांना शनिवार, दि. 26 रोजी पहाटे हृदय विकाराचा झटका आला. त्यांना कृष्णा हॉस्पीटल येथे उपचासाठी आणण्यात आले. मात्र, त्यांचा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच कराड बस आगारातील कर्मचार्‍यांनी कृष्णा हॉस्पीटलकडे धाव घेतली.
कराड आगारात बाळासाहेब पाटील यांनी जवळपास 18 वर्षे सेवा बजावली आहे. गेल्या 110 दिवसापासून सुरू असलेल्या विलीनीकरणाच्या लढ्यात ते सहभागी होते. गेल्या काही दिवसापासून ते अर्थिक विवंचनेत असल्याचे काही सहकार्‍यांनी सांगितले. आपल्यातील चालकाचा अचानक मृत्यू झाल्याने कर्मचार्‍यांच्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व आई-वडिल असा परिवार आहे.

COMMENTS