सत्ता संघर्षात संबंधामुळे कोणीच बोलायला व वाईटपणा घ्यायला तयार नाही : खासदार डॉ.सुजय विखे.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्ता संघर्षात संबंधामुळे कोणीच बोलायला व वाईटपणा घ्यायला तयार नाही : खासदार डॉ.सुजय विखे.

अभिजित खंडागळे/पाथर्डी : आज सत्ता संघर्षात संबंधामुळे कोणीच कोणाच्या विरोधात बोलण्यास व वाईटपणा घेण्यास तयार नाही.या गोष्टीचे वाईट वाटत असून,या जिल्ह

देवळाली प्रवरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दोन गटात राडा
संस्थेचा शाहू, फुले, आंबेडकर पुरस्काराने सुखावलो : रामकृष्ण भिंगारे
पालखेड डाव्या कालव्यातून पाझर तलाव व बंधारे भरून द्या

अभिजित खंडागळे/पाथर्डी : आज सत्ता संघर्षात संबंधामुळे कोणीच कोणाच्या विरोधात बोलण्यास व वाईटपणा घेण्यास तयार नाही.या गोष्टीचे वाईट वाटत असून,या जिल्ह्यात पुन्हा ज्या प्रस्थापितानी गोरगरिबांना त्रास दिला.त्यांच्या विरोधात विखे पाटील कुटुंब आज ही उभं आहे आणि उद्याही उभं राहत कै.लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांपासून कै.बाळासाहेब विखे पाटलापर्यत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आधार घेत या सगळ्याचा आवाज बनून गोरगरिबांना न्याय देण्याचे जिल्ह्यात काम करणार आहोत.शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील लाभार्थ्यांना राष्ट्रीय वयोश्री योजनेचे मोफत साहित्य साधने वितरण प्रसंगी खासदार डॉ सुजय विखे बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मोनिकाताई राजळे ह्या होत्या.यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे,तालुकाध्यक्ष माणिक खेडकर,माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, माजी जि प सद्स्य राहुल राजळे, मा.उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, अजय रक्ताटे, बंडूशेठ बोरूडे,गोकुळ दौंड,दिनकर पालवे,विष्णूपंत अकोलकर,अनिल बोरुडे,अजय भंडारी, महेश बोरुडे, प्रतीक खेडकर,पांडुरंग सोनटक्के,अजिनाथ मोरे,आदी जण उपस्थित होते. पुढे बोलताना विखे यांनी म्हटले की,पाथर्डी शेवगाव मतदार संघातील सकाळी व रात्री वेगळं बोलणाऱ्या काही बुद्धिजीवी लोकांनी आमदार आणि माझ्यावर या योजनेबाबत टीका केली.विरोधकांना जिल्ह्यापरिषदेत संधी मिळाली परंतु तिथे काय चाललंय १० टक्क्यांशिवाय काम मंजुर होत नाही.पाथर्डी शेवगावाचा विकास करणार का? हा विचार नागरिकांनी करणे गरजेचे आहे.
शाळेच्या खोल्या पडायला आल्यात झाडाखाली शाळा चालु आहे.मुलांना शिक्षणासाठी पैसे नाहीत.अशा मुलांना मोफत शिक्षण देण्याऐवजी खोल्यांमध्ये टक्केवारी घेण्याइतपत नैतिकता जिल्हापरिषदेची गेली हे जिल्ह्याचे दुर्दैव.दुसरीकडे बांधलेले बंधारे एका पावसात वाहून गेले.लोकशाहीत काम करून निवडणुकीला सामोरे जात मतदान मागणे हे आमचे काम आहे.एका ठिकाणी सत्ता देऊन त्यांचे परिणाम काय होतात हे जिल्ह्यापपरिषदेला तुम्ही पाहिले असून ही प्रथा नगरमध्ये कधीच नव्हती.मागच्या तीन वर्षांत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्वतःच्या खिशातुन पैसे खर्च करून कोणता कार्यक्रम घेतला असेल तर मी त्यांना या व्यासपीठावर येऊन सांगावे असे आवाहन देतो. वीज नाही पाणी नाही मग कशासाठी मंत्रीपद कशासाठी अध्यक्षपद कशासाठी सत्ता.मला टक्केवारीसाठी नाही तर अशा योजनेमधून गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार व्हाच आहे.या योजनेचे साहित्यासाठी नोंदणी करताना कोणाला पक्ष किंवा जात विचारली नाही कारण आम्ही नैतिकतेमध्ये जगणारे लोक आहोत.असे मत व्यक्त केले.वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांच्या वतीने खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

:- कार्यक्रमस्थळी खासदार डॉ.सुजय विखे यांना आमदार मोनिका राजळें यांची ५ ते १० मिनिटे करावी लागली प्रतीक्षा.

COMMENTS