Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पावसाने उघडीप दिल्याने दिवाळीनिमित्त पालकमंत्र्यांचे शेतकर्‍यांच्या बांधावर दौरे

सातारा / प्रतिनिधी : पावसाने उघडीप दिली असल्याने ऐन दिवाळीतही पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे त्यांच्या स्वत:च्या पाटण

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी फलटणनगरी सज्ज
जीप पलटी झाल्याने जेजुरीहून धुळदेवकडे निघालेल्या नवरदेवाचा अपघाती मृत्यू
कोणेगावच्या गिर्यारोहकाने केला नानाचा अंगठा सर

सातारा / प्रतिनिधी : पावसाने उघडीप दिली असल्याने ऐन दिवाळीतही पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे त्यांच्या स्वत:च्या पाटण मतदार संघातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकाची पाहणी करण्यासाठी पाटण तालुक्यातील तारळे, पांढरवाडी, काटेवाडी, धनगरवाडी येथील शेतकर्‍यांच्या बांधावर पोहचले. 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानग्रस्त पिकांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच नुकसान भरपाई शेतकर्‍यांना देण्यात येणार असल्याचे ना. देसाई यांनी यावेळी सांगितले.
या शेतपिक पाहणी वेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर खिल्लारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, कृषी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ना. देसाई म्हणाले अतिवृष्टीने 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानग्रस्त झालेल्या शेतपिकांचे चार दिवसात वस्तुनिष्ठ पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठविण्यात येईल. हे पंचनामे चार दिवसात पूर्ण होण्यासाठी महसूल कृषी यांच्यासह विविध विभागांचा सहभाग घेऊन वेगवेगळी पथके तयार करण्यात यावी. दिवाळी असून ही पालकमंत्री आणि प्रशासन शेतकर्‍यांच्या बांधावर आहे. जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्यात येईल.

COMMENTS