Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

त्या महिलेच्या दबावामुळेच सुधीर मोरेंची आत्महत्या

संबंध ठेवले नाही तर, आयुष्य संपवण्याची दिली होती धमकी

मुंबई/प्रतिनिधी ः ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक सुधीर मोरे यांच्या आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर येत असून, या प्रकरणात आरोपी असलेल्या या

भयानक राडा, दोन गटांमध्ये तुफान दगडफेक | LOKNews24
मोहिनीनगरला घरफोडीत 16 हजाराचा ऐवज चोरीस
शेतकरी आंदोलनावर पंधरा दिवसात तोडगा काढा ;सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला ताकीद

मुंबई/प्रतिनिधी ः ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक सुधीर मोरे यांच्या आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर येत असून, या प्रकरणात आरोपी असलेल्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने  टाळून लावला. त्यामुळे त्या आता अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे. माझ्याशी संबंध ठेवले नाहीतर आयुष्य संपवेन, अशी धमकी एका महिलेने सुधीर मोरे यांना दिली होती. मोरेंनी बोलणे बंद केल्यावर ब्लॅकमेल करण्याचे काम सदर महिला करत होत्या. आत्महत्येपूर्वी या महिलेने मोरेंना 56 वेळा फोन केला होता, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.
सुधीर मोरे यांना व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज, ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल्स करण्यात आले होते. मोरेंनी या महिलेला आपली छळवणूक थांबवण्याची विनंती केली होती. पण, कोणतीही दया या महिलेने दाखवली नाही, अशी बाजू सरकारी वकील इक्बाल सोलकर यांनी पोलिसांतर्फे मांडली आहे. उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील खंदे समर्थक तथा माजी नगरसेवक सुधीर मोरे यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला होता. घाटकोपर रेल्वे स्थानकालगतच्या रुळावर त्यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला. त्यामुळे त्यांनी लोकलपुढे उडी मारून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यांच्या आत्महत्येमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मात्र, त्यांना महिलेकडून धमक्या येत असल्याने त्यांनी पाऊल उचलले अशी माहिती समोर येत आहे. सुधीर मोरे यांना गत काही महिन्यांपासून कुणीतरी ब्लॅकमेल करत होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्येसारखे गंभीर पाऊल उचलले. त्यांनी 2 महिन्यांपूर्वीच काही कॉल रेकॉर्ड करण्यासाठी एक नवा मोबाईल खरेदी केला होता. हा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घ्यावा, अशी मागणी त्यांच्या निकटवर्तीयांनी केली आहे. सुधीर मोरे हे उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक होते. ते रत्नागिरीचे शिवसेना संपर्कप्रमुख, शिवसेनेचे नगरसेवक व विभागप्रमुखही होते. सुधीर यांनी लोको दोस्त नावाची संघटना स्थापन केली होती. त्यातूनच त्यांचा राजकारणातील प्रवास सुरू झाला होता. त्यांच्या वहिणीही माजी नगरसेवक होत्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांचीच साथ देणे पसंत केले. सुधीर मोरे यांनी घाटकोपर पश्‍चिम विधानसभा मतदार संघातून भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात निवडणूक लढवली. पण त्यात त्यांना पराभव सहन करावा लागला होता.

COMMENTS