देवळाली प्रवरा ः शासनाने चालू शैक्षणिक वर्षापासून ’एक राज्य एक गणवेश’ योजना सुरु केली. योजनेच्या पहिल्या टप्प्यात फज्जा उडाला आहे. दोन गणवेश जून
देवळाली प्रवरा ः शासनाने चालू शैक्षणिक वर्षापासून ’एक राज्य एक गणवेश’ योजना सुरु केली. योजनेच्या पहिल्या टप्प्यात फज्जा उडाला आहे. दोन गणवेश जून महिन्याच्या ऐवजी अर्धे शैक्षणिक वर्ष संपायला आल्यावर पहिला गणवेश मिळाला आहे. मिळालेला गणवेश त्याचे कापड निकृष्ट दर्जाचे; शिलाई निकृष्ट दर्जाची आहे. ज्या पद्धतीने गणवेशाची रचना ठरविण्यात आली.त्या रचनेनुसार विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीच उलट शर्टवरती शोल्डर स्ट्रीप नाहीत. दोन ऐवजी एकच खिसा लावला असल्याने विद्यार्थ्यांबरोबर पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. चालु शैक्षणिक वर्षातील गणवेशा बाबत लहान, ढगळ, फाटके अन् तिरप्या खिशांचे व निकृष्ट दर्जाच्या कापडाचे गणवेश’ विद्यार्थ्यांना दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर शिक्षण विभागाच्या भोगंळ्या कारभारा बाबत चर्चेला तोंड फुटले.
गणवेशा संदर्भातील वृत्ताचे पालक व शिक्षकांनी स्वागत केले असले तरी उंदराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.वळण येथिल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोविंद फुणगे व सदस्यांनी निकृष्ट दर्जाचे गणवेश स्वीकारण्यास स्पष्ट शबदात नकार दिला.या शाळा व्यवस्थापन समितीने आवाज उठविण्यास सुरवात केली आहे.बाकीच्या शाळा व्यवस्थापन समितीने शासनाच्या निकृष्ट दर्जाच्या गणवेशाला विरोध न करता. लहान, ढगळ, फाटके अन् तिरप्या खिशांचे व निकृष्ट दर्जाच्या कापडाचे गणवेश’ स्वीकारले आहेत.परंतू वळण येथिल शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या निर्णयामुळे या प्रश्नाला वाचा फुटली आहे. शासनाने खरेदी केलेले कापड हलक्या दर्जाचे असल्याने अंगात घालताच फाटत आहे.विद्यार्थ्यांनी अवघा एकच दिवस गणवेश घातला त्या दिवशी शिलाई उधडत आहे. अंगात घातल्यावर एका तासात शिलाई उधडत असलेला गणवेश वर्षभर कसा टिकणार? असा प्रश्न पालक व शिक्षकांसमोर उभा राहिला आहे. गणवेशास एक टिप मारण्यासाठी शिलाई करणारा दहा रुपये घेत असल्याने पुर्ण गणवेशाला टिपा मारण्यासाठी गणवेशाची किमंत मोजावी लागणार आहे. पालकांनी गणवेश विकत घेतले असते तर ते परवडले असते असे काही पालकांनी प्रतिक्रीया व्यक्त करताना सांगितले आहे. एक रंग, एक दर्जा करिता प्राथमिक शिक्षण परिषदेतर्फे ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. सर्वात कमी रकमेची निविदा मंजूर करण्यात आली. या निविदेद्वारे निकृष्ट दर्जाचे कापड खरेदी करण्यात आहे. त्या कापडातून गणवेश शिलाई करण्यात आले. निकृष्ट दर्जामुळे गोरगरीब मुलांची शासनाने क्रुर चेष्ठा केली आहे.
सत्ताधार्यांसह विरोधकांनी ठेवले तोंडावर बोट? – राहुरी आमदार प्राजक्त तनपुरे व माजी खा.प्रसाद तनपुरे या बाप लेकांनी शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशा बाबत संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करुन माजी खा.तनपुरे यांनी गणवेश हातात घेवून कपाळावर हात मारुन घेतला आहे. वस्तुस्थिती जाणून घेतल्यावर शासनाची गणवेश योजना फसल्याची प्रतिक्रिया माजी. खा.तनपुरे यांनी व्यक्त केली. शालेय गणवेशाचा निकृष्ट दर्जाचा प्रश्न गाजत असतानाही सत्ताधार्यांसह विरोधकांनीही हाताची घडी तोंडावर बोट? ठेवल्याने शासनाकडे न्याय मागण्यासाठी आवाज कोणी उठवायचा असा प्रश्न तयार झाला आहे.
COMMENTS