नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि परिसरात शनिवारी सकाळपासून दाट धुक्याची चादर पसरली आहे. उत्तर भारतात जाणवत असलेल्या तीव्र थंडीच्या लाटेसो

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि परिसरात शनिवारी सकाळपासून दाट धुक्याची चादर पसरली आहे. उत्तर भारतात जाणवत असलेल्या तीव्र थंडीच्या लाटेसोबतच या धुक्याचा थेट परिणाम हवाई तसेच रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दृश्यमानता मोठ्या प्रमाणात घटल्याने अनेक उड्डाणे उशिराने रवाना झाली.
दिल्ली विमानतळ प्रशासनाने सकाळीच उड्डाणांच्या विलंबाबाबत सूचना जारी केली असून, प्रवाशांना प्रवासापूर्वी संबंधित विमान कंपनीकडून आपल्या उड्डाणाची स्थिती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धुक्यामुळे कामकाजात अनपेक्षित अडथळे येण्याची शक्यता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, रेल्वे वाहतुकीवरही धुक्याचा मोठा परिणाम झाला आहे. सुमारे 177 गाड्या विलंबाने धावत असून, काही गाड्यांना दोन ते आठ तासांचा उशीर होत आहे. दिल्ली-एनसीआरमधून जाणार्या आणि येणार्या बहुतांश प्रमुख रेल्वे मार्गांवर हा परिणाम जाणवत आहे. प्रयागराज, लखनऊ, कानपूर, गाझियाबाद, मेरठ, आग्रा आणि झाशी विभागातील अनेक गाड्यांना लक्षणीय विलंबाचा सामना करावा लागत आहे. रेल्वे अधिकार्यांच्या माहितीनुसार, धुक्यामुळे सिग्नलिंग व्यवस्था आणि ट्रॅकवरील दृश्यमानता कमी झाल्याने सुरक्षेच्या दृष्टीने गाड्या नियंत्रित वेगाने चालवण्यात येत आहेत.

COMMENTS