कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव शहरातील मोटार सायकल चोरणार्या 4 चोरांना 3 मोटार सायकल सह मोठ्या शिताफीने जेरबंद केले असल्याची माहिती कोपरगाव शहर पोल

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव शहरातील मोटार सायकल चोरणार्या 4 चोरांना 3 मोटार सायकल सह मोठ्या शिताफीने जेरबंद केले असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली आहे. सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये शनिवार दि 11 मार्च रोजी गुन्हा रजि. नंबर 119/2023 भादंवी क.379.34 प्रमाणे 12000रू. किंमतीची हिरो होंडा कंपनीची सि. डी. डॉन मोटार सायकल अज्ञात चोरांनी संजय नगर जेऊर कुंभारी ता कोपरगाव येथून चोरून नेल्याची गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपीचा तपास कोपरगाव शहर पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी कसुन शोध घेतला असता सदर गुन्हयातील दुचाकी चोरी करणारे आरोपी महेश अन्नासाहेब गायकवाड रा. शनिमंदिर रोड राहाता, निलेश दिलीप जाधव रा शनि चौक राहता , किरण चंद्रकांत जाधव रा संजय नगर जेऊर कुंभारी, सोमनाथ किसन वरशिळ रा संजय नगर जेऊर कुंभारी ता कोपरगाव यांचा शोध घेवून त्यांची पोलीस तपासात कसुन चौकशी केली असता सदर आरोपींनी वरील गुन्ह्या दाखल असलेली दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले असता त्यांचा कडे अधिकची चौकशी केली असता त्या आरोपीनी लोणी पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्हा रजि.नं. 140/2023 भादवी क.379 प्रमाणे तेथील मोटार सायकल चोरी केले बाबत कबूल केले असता कोपरगाव शहर पोलीसांनी त्या आरोपींकडून कोपरगाव शहर व लोणी पोलिस स्टेशन मधील दाखल गुन्ह्यातील 2 दुचाकी व बजाज कंपनीची प्लॅटीना दुचाकी अशा एकूण 3 मोटार सायकल वरील आरोपी कडून जप्त करण्यात आल्या आहे. सदची कौतुकास्पद कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव शिर्डी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोलीस उपनिरिक्षक रोहीदास ठोंबरे पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस उपनिरीक्षक संजय पवार, पोहेकॉ किशोर जाधव, पोना अर्जुन दारकुंडे, पोना महेश गोडसे, पोकॉ गणेश थोरात, पोकॉ संभाजी शिंदे, पोकॉ गणेश काकडे, पोकॉ राम खारतोडे, पोकॉ यमनाजी सुंबे, पोकॉ महेश फड आदी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या पोलिस पथकाने केली.
COMMENTS