शिर्डी/प्रतिनिधी ः राज्यात खराब हवामान व पाऊस पडण्याच्या शक्यतेमुळे सोगनीला आलेले पिके काढण्यासाठी बळीराजाची लगबग वाढली आहे. त्यातच पुढील काही दि

शिर्डी/प्रतिनिधी ः राज्यात खराब हवामान व पाऊस पडण्याच्या शक्यतेमुळे सोगनीला आलेले पिके काढण्यासाठी बळीराजाची लगबग वाढली आहे. त्यातच पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे गहू,हरभरा व इतर काढणीला आलेल्या आपले पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरीची लगबग. तसेच गहू पीक काढण्यासाठी हार्वेस्टरला मागणी वाढल्याची चित्र राहाता परिसरात पाहण्यास मिळत आहे.
राहाता तालुक्यामध्ये हार्वेस्टरची संख्या ही अल्प प्रमाणात असल्याने भल्या पहाटेपासूनच या हार्वेस्टर मिळण्यासाठी वेटिंगला नंबर लावण्यात येत आहे.काही दिवसांपूर्वी हवामान तज्ञ पंजाबराव डंक यांनी केलेल्या हवामानातील बदलांचा केलेल्या अंदाजानुसार वातावरणात बदल झाल्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे. काही ठिकाणी गहू सोगणीला आला असून तर काही ठिकाणी हा ओल्या स्वरूपात पाहण्यास मिळत आहे. जर पाऊस झाला तर शेतात उभा असलेल्या गव्हाच्या पिकाला पाऊस लागला तर गहू खराब होऊ शकतो. यासाठी बळीराजा हार्वेस्टरच्या शोधात फिरत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये राहाता शहरासह परिसरात अतिवृष्टी झाल्या झाल्याने शेतकर्यांच्या शेतात एक ते दीड महिन्यापर्यंत शेतीत साचलेल्या पाण्याचा निसार झाला नाही. त्यामुळे शेतकर्यांना पेरणीसाठी उशीर झाला.अतिवृष्टी मुळे ज्या शेतकर्यांच्या पिकांची नुकसान झाले आहे पिक विम्याच्या यादीमध्ये नाव असून सुद्धा त्यांना अजूनही भरपाई मिळाली नाही. शेतकर्याच्या कोणत्याही पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हे हवालदिल झाला. शेतकर्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही,कांद्याला भाव नाही,त्यातच बदलत्या हवामान व वातावरणामुळे द्राक्ष बाग,पेरू व इतर फळबागा धोक्यात आल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. आई जेवू दे ना व बाप खाऊ देना अशी शेतकर्यांची अवस्था झाल्याचे पाहावयास मिळत आहे.हाताशी आलेली पिकांची नुकसान आपल्या डोळ्यासमोर होत असल्यामुळे शेतकर्यांच्या डोळे पानावले आहे.
दरम्यान, दुसरीकडे शासनाचे नोकर असलेले कर्मचारी हे सातवा आयोगानुसार भरमसाठ पगार बोनस घेत असून आता त्यांनी पेन्शन मिळावी यासाठी राज्यभर बेमुदत संप पुकारला आहे. एकीकडे शेतकर्यांच्या पिकाला भाव मिळत नसून भाव मिळण्यासाठी आम्ही शेतकर्यांनी सुद्धा राज्यभर बेमुदत संप पुकारावा का तरच सरकारला व राज्यकर्त्यांना जाग येईल का ? असा भावनिक प्रश्न शेतकरी विचारत आहे.
COMMENTS