Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गाडीचा ब्रिकफेल झाल्याने संरक्षण भिंत तोडून बस शिरली इमारतीत 

कल्याण प्रतिनिधी - बसचा ब्रेकफेल होऊन थेट  सोसायटीची संरक्षण भिंत तोडून थेट गाड्यांवर कोसळल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेच्या गोदरेज हील

जिल्हा बँकेचे लेखा परीक्षण करणार खासगी लेखा परीक्षक ; 26 लेखा परीक्षकांची नेमणूक
मढीत मानाची होळी पेटवत कानिफनाथ यात्रेला सुरूवात
लायन्स क्लब कोपरगावतर्फे 100 कुटूंबाना दिवाळी फराळाचे वाटप

कल्याण प्रतिनिधी – बसचा ब्रेकफेल होऊन थेट  सोसायटीची संरक्षण भिंत तोडून थेट गाड्यांवर कोसळल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेच्या गोदरेज हील परिसरात घडली असून, या दुर्घटनेत चालक किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने यामध्ये कोणाला दुखापत झाली नाही.  मात्र बसचे ब्रेकफेल झाल्याने हा अपघात झाला असून सोसायटी मधील  २-३  गाड्यांचे नुकसान झाले आहे.  दरम्यान  गोदरेज हिल परिसरात सोसायटीच्या रहिवाशांसाठी खासगी ट्रॅव्हल्सकडून बस चालवली जाते.  आज संध्याकाळी गोदरेज हीलवरून खाली उतरत असताना या मार्गावर असणाऱ्या एका वळणावर हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती  समजण्यात अली.  खाली येत असताना अचानक बसचे नियंत्रण सुटले आणि खाली असणाऱ्या मलबारी सोसायटीची संरक्षण भिंत तोडून ही बस तिथल्या गाड्यांवर कोसळली. सध्या घटनास्थळी खडकपाडा  येथिल पोलीस दाखल झाले असून नेमकं काय कारण आहे याचा शोध घेत आहे.

COMMENTS