पुणे/प्रतिनिधी : पुण्यामध्ये अमली पदार्थांची तस्करी होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. पुण्यातील तरुण व्यसनांच्या आहारी गेल्याचे दिसून ये
पुणे/प्रतिनिधी : पुण्यामध्ये अमली पदार्थांची तस्करी होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. पुण्यातील तरुण व्यसनांच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहेत. दिवसेंदिवस पुणे हे अमली पदार्थ तस्कारांचे हब होत चालल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अशामध्ये पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत 46 लाखाचे अमली पदार्थ जप्त केले आहे. यामध्ये कोकेन, मेफेड्रोनचा समावेश होता.
याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह चौघांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात कोकेन, मेफेड्रोनची विक्री करणार्या एका महिलेसह तिघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. पुण्याच्या मुंढवा भागात ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपींकडून 46 लाख 59 हजार रुपयांचे कोकेन, मेफेड्रोन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. सागर कैलास भोसले (वय 26, रा. खराडी), अजितसिंग इंद्रजितसिंग भवानीया (वय 40, रा. लोहगाव रस्ता), इम्ररीन गॅरी ग्रीन (वय 37, रा. लोहगाव रस्ता) आणि राधा सुतार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मुंढव्यातील लोणकर वस्ती भागात दोघेजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत आरोपींना अटक केली. आरोपींची तपासणी केली असता त्यांच्याकडून पोलिसांनी 46 लाख 59 हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे. चौकशीत दोघांनी भवानीया यांच्याकडून अमली पदार्थ खरेदी केल्याची माहिती मिळाली. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
COMMENTS