अहमदाबाद : गुजरातमध्ये इराणहून आलेली बोट पकडण्यात आली आहे. या बोटीमध्ये तब्बल 425 कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. गुजरात एटीएस आणि कोस्टगार
अहमदाबाद : गुजरातमध्ये इराणहून आलेली बोट पकडण्यात आली आहे. या बोटीमध्ये तब्बल 425 कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. गुजरात एटीएस आणि कोस्टगार्डच्या अधिकार्यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. यामध्ये बोटीतील 5 आरोपींना अटक करण्यात आली. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील ओखाच्या समुद्रकिनार्याजवळ एटीएस आणि कोस्टगार्डने इराणहून आलेली एक संशयास्पद बोट पकडली आहे. या बोटीची तपासणी केली असता त्यामध्ये 425 कोटी किंमतीचे 61 किलो हेरॉइन आढळून आले. या बोटीतून 5 जणांना अटक करण्यात आली आहे. एटीएसच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खबर्याकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरात मोठ्या प्रमाणात हेरॉइन येणार अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार ही संयुक्तपणे कारवाई करण्यात आली आहे. ओखा समुद्रकिनार्यापासून तब्बल 340 किलोमीटर दूर अंतरावर एक संशयित बोट आढळून आली. गस्तीवर असलेल्या कोस्टगार्डच्या अधिकार्यांनी बोटीला थांबण्याची सूचना केली. पण, तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पाठलाग करून या बोटीला पकडण्यात आल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
COMMENTS