Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा ः सचिन वाबळे

कोपरगाव प्रतिनिधी ः संपूर्ण कोपरगाव तालुक्यात सरसगट कोरडा दुष्काळ जाहीर करत सर्व शेतकर्‍यांना त्वरित मदत जाहीर करावी अशी मागणी भारत राष्ट्र समिती

बेलापूर येथे राहुरी पोलिसांचा रात्रीस खेळ चाले l पहा LokNews24 —————
पाणी सोडत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही
कोण होणार महापौर? नगरसेवकांना प्रतीक्षा निवडणूक कार्यक्रमाची

कोपरगाव प्रतिनिधी ः संपूर्ण कोपरगाव तालुक्यात सरसगट कोरडा दुष्काळ जाहीर करत सर्व शेतकर्‍यांना त्वरित मदत जाहीर करावी अशी मागणी भारत राष्ट्र समितीचे कोपरगाव तालुका समन्वयक सचिन वाबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोपरगावचे नायब तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
यावेळी रावसाहेब टेके, बाळासाहेब जाधव, आबूभाई मणियार, लक्ष्मणराव वैराळ, भागवतराव कदम, आलिम भाई, रमाकांत टेके, संजय रक्ताटे, संतोष आहेर, मोहिते, वहाडणे आदीं सह भारत राष्ट्र समितीचे कोपरगाव तालुका पदाधिकारी उपस्थित होते. कोपरगावच्या नाहीत तहसीलदार सातपुते मॅडम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की संपूर्ण तालुक्यात गेल्या तीन महिन्यापासून पावसाने पूर्णपणे वोट दिल्याने खरीप हंगाम हंगाम पूर्णतः वाया गेला आहे पण तसेच पाटबंधारे खात्याच्या डीसा नियोजनामुळे कॅनॉलचा पाणीपुरवठा देखील पूर्णपणे शेतकर्‍यांच्या पिकाला होऊ शकला नाही त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून शासनाने तत्काळ संपूर्ण कोपरगाव तालुक्यात विना आठ दुष्काळ जाहीर करत शेतकर्‍यांना योग्य ती मदत करावी तसेच दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यासंबंधी व जनावरांना पुरेसा इतका चारा व पाण्याची सोय निर्माण करण्यासाठी योग्य ती कारवाई करावी तसेच विजेचा अनिमित पणे होणारा पुरवठा सुरळीत करण्यात करणे कामी तसेच कॅनॉलच्या चार्‍या दुरुस्ती करणे कामी शासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी भारत राष्ट्र समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनाद्वारे राज्य शासनाकडे केली आहे.

COMMENTS