Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित

अर्थसंकल्पात अजित पवारांची घोषणा

मुंबई प्रतिनिधी - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पातून राज्याला, सामान्य नागरिक, शे

अजित पवारांना मिळणार अर्थखाते ?
कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनातातील वाढीसाठी प्रस्ताव तयार करा
राज्यात राजकीय जोर-बैठका सुरूच

मुंबई प्रतिनिधी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पातून राज्याला, सामान्य नागरिक, शेतकऱ्यांना काय मिळणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. कुसुमाग्रजांना अभिवादन करुन अजित पवारांनी अर्थसंकल्पाला सुरुवात केली. जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार असल्याचे त्यांनी सुरुवातील सांगितले. तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. अटल सेतू- कोस्टल रोडला जोडण्यासाठी 2 बोगद्याची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यात गुंतवणूक वाढवण्यावर भर असेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात सहा वंदे भारत एक्सप्रेस सुरु करणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले. नगरविकास विभागासाठी 10 हजार कोटी, बांधकाम विभागासाठी 19 हजार 900 कोटी, सामान्य प्रशासन विभागाला 1 हजार कोटी दिले जाणार आहेत. ईस्टर्न फ्रीचा विस्तार ठाण्यापर्यंत केला जाणार आहे तर 18 लघुवस्त्रोद्योग संकुल स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. तर विदर्भातील दुष्काळ दूर करण्यासाठी 2 हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरुन काढला जाणार आहे.

COMMENTS