Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंपळनेर भागात जिरायती भागावर दुष्काळाचे संकट

पाऊस नसल्याने खरीप तर गेला, रब्बीही जाणार

पिंपळनेर प्रतिनिधी - सध्याची पावसाची परिस्थिती पाहता बीड तालुक्यासह पिंपळनेर परिसरामध्ये जिरायती भागावर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. ऑगस्ट महिनादेख

“नेमके खरे मुख्यमंत्री कोण आहे हेच कळत नाही”
सांगली नदी पात्रात माश्यांचा खच 
एकलव्य स्कूल प्रवेशपूर्व परीक्षेत एकात्मिक शासकीय आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

पिंपळनेर प्रतिनिधी – सध्याची पावसाची परिस्थिती पाहता बीड तालुक्यासह पिंपळनेर परिसरामध्ये जिरायती भागावर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. ऑगस्ट महिनादेखील संपत आला तरी पाऊस पडत नसल्याने पाण्यावाचून अनेक शेतजमिनी पडीक पडल्या आहेत. शेतकर्‍यांवर अक्षरशः पाणी-पाणी करण्याची वेळ आली आहे.
खरीप हंगामातील पावसावर येणारे बाजरी हे हक्काचे पीक. परंतु पाऊसच पडला नसल्याने अनेक भागात या वर्षी बाजरीच्या पेरण्या झाल्या नाहीत. ज्या शेतकर्‍यांनी बाजरीच्या पेरण्या केल्या त्यादेखील पावसावाचून जळण्याच्या मार्गावर आहेत. सध्या पावसासाठीचे   वातावरण तयार होत नसून नुसते वारे  वाहत आहे. दिवसभर ऊन पडत असून, पावसाची चिन्हे दिवसेंदिवस धुसर होताना दिसत आहे. या परिस्थितीमुळे आता येणारा रब्बी हंगामदेखील धोक्यात सापडला आहे. त्यामुळे दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप हंगामातील बाजरी पिकाच्या 60 टक्केच पेरण्या झाल्या आहेत. पावसाअभावी ते पीकदेखील जळू लागले आहे, तर रब्बी हंगामातील ज्वारीच्या पेरण्या 15 सप्टेंबरनंतर होतात. परंतु पाऊस नसल्याने रब्बी हंगामही यंदा धोक्यात आहे. पंधरवड्यात जर पाऊस चांगला झाला तरच ज्वारीच्या पेरण्या होतील ,असे पिंपळनेरचे शेतकरी ,राम जाधव यांनी सांगितले.

COMMENTS