जेरूसेलम : इस्रायल विरुद्ध पॅलेस्टिन, हमास व लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या युद्धाने आता टोक गाठले आहे. इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून लेबन
जेरूसेलम : इस्रायल विरुद्ध पॅलेस्टिन, हमास व लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या युद्धाने आता टोक गाठले आहे. इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटनेने आता थेट इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना लक्ष्य केले आहे. नेत्यानाहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. इस्राइल सरकारच्या पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या दाव्यानुसार हा ड्रोन हल्ला लेबनॉनमधून झाल्याचे म्हटले आहे. एका इमारतीवर या ड्रोनचा स्फोट झाला. याशिवाय, या भागात आणखी दोन ड्रोन डागण्यात आले. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ड्रोन हल्ला झाला तेव्हा नेतान्याहू त्यावेळी आपल्या निवासस्थानी नव्हते. या हल्ल्यानंतर तेल अवीवमध्ये सतर्कतेचे सायरन वाजवण्यात आले आहे. हिजबुल्लाहसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तीन ड्रोन डागण्यात आले आहेत. यापैकी एक सीझरिया शहरातील इमारतीवर पडले, जे लेबनॉनमधून आणखी दोन ड्रोन सोडले गेले. त्यामुळे गिलोट लष्करी तळावर अलार्म वाजू लागला. आयडीएफने कबूल केले की त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा हल्ला रोखण्यात अयशस्वी ठरली, ज्यामुळे हा हल्ला झाला. ड्रोन घुसल्याचा तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.
COMMENTS