Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दारू पिऊन गाडी चालवल्यास लायसन्स होणार रद्द

पुणे पोलिसांचा ड्रिंक अ‍ॅड ड्राईव्ह पार्श्‍वभूमीवर निर्णय

पुणे ः पुण्यात गेल्या काही दिवसांपासून हिट अ‍ॅण्ड रनच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या मनात रस्त्यांवर चालण्याची देखील भीती निर्माण

कोतुळेश्‍वर विद्यालयाचे कबड्डी स्पर्धेत यश
ऑटोग्राफनंतर एमएस धोनीने चाहत्याकडून मागितले चॉकलेट
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरची बनवणार :मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्‍वास

पुणे ः पुण्यात गेल्या काही दिवसांपासून हिट अ‍ॅण्ड रनच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या मनात रस्त्यांवर चालण्याची देखील भीती निर्माण झाली आहे. शिवाय हिट अ‍ॅण्ड रनच्या घटनांमध्ये दारू पिऊन गाडी चालवल्यामुळेच अपघात झाल्याचे समोर आले आहे. त्याविरोधात पुणे पोलिसांनी दारू पिऊन गाडी चालवणार्‍याविरोधात कठोर पाऊल उचलले असून, यापुढे दारू पिऊन गाडी चालवल्यास गाडीचे लायसन्स रद्द करण्यात येणार आहे.
पुण्यात गेल्या 6 महिन्यात 1648 जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी दारू पिऊन वाहन चालवणे यांच्यावर फक्त खटले पाठवून त्यांच्यावर कारवाई केली जात होती. मात्र यापुढे जर आता कोणी चालक दारू पिऊन गाडी चालवताना आढळून आला तर पहिल्यांदा त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स 3 महिने रद्द केले जाईल, त्याच व्यक्तीने जर पुन्हा गुन्हा केला तर 6 महिन्यापर्यंत त्याचा परवाना रद्द होणार मात्र तिसर्‍या वेळीस पुन्हा तीच व्यक्ती आढळून आली तेव्हा मात्र त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द होणार, अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे. पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अपघाच्या अनेक घटना घडल्या असून, यामधील बहुतांश घटना हिट अँड रन प्रकरणातील असल्यामुळं एकच खळबळ माजली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे धाबे दणाणून सोडणार्‍या या वेग बहाद्दरांमुळे रस्त्यावरून चालयचीसुद्धा भीती वाटू लागली आहे, अशाच प्रतिक्रिया सध्या पुण्यातील नागरिकांनी देण्यास सुरुवात केली आहे.

COMMENTS