Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुळजाभवानी मंदिरात आता ड्रेसकोड

तुळजापूर प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानी मंदिरामध्ये यापुढे ड्रेसकोडशिवाय प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे.

सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिदिनी शिवभक्तांनी केल महाराजांना अभिवादन 
सोशल मीडियावर जातीवाचक पोस्ट टाकणे पडले महागात
एकलव्य स्कूल प्रवेशपूर्व परीक्षेत एकात्मिक शासकीय आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

तुळजापूर प्रतिनिधी – संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानी मंदिरामध्ये यापुढे ड्रेसकोडशिवाय प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे. या मंदिरामध्ये वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना प्रवेश मिळणार नाही. तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. मंदिर परिसरामध्ये याबातचे फलक देखील लावण्यात आले आहेत.

तुळजाभवानी मंदिरामध्ये यापुढे पुजाऱ्यांसह भाविकांना ड्रेसकोड असणार आहे. मंदिरात ड्रेसकोडशिवाय प्रवेश बंद करण्यात आला आहे. मंदिरातील पुजाऱ्यांसह भाविकांना ड्रेसकोड असणार आहे. काही पुजारी मंदिर परिसरात जिन्स आणि शर्ट घालून फिरत असल्याचे मंदिर प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर मंदिर प्रशासनाने नोटीस काढत मंदिर परिसरात फलके लावली आहे. ड्रेसकोडचे पालन न केल्यास कारवाई केली जाणार आहे.

तुळजाभवानी मंदिर परिसरात ‘अंग प्रदर्शन, उत्तेजक, असभ्य आणि अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पँट, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश नाही, असे फलक लावण्यात आले आहेत. या फलकावर ‘कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भाव ठेवा, अशा प्रकारची देखील विनंती करण्यात आली आहे. त्याचसोबत, मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर भाविकांशिवाय पुजाऱ्यांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थेने अशा सूचनांचे फलक मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही.

COMMENTS