मुंबई ः जिंकण्याची खात्री असेल तरच जागा मागा असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या महायुतीच्या बैठकीत दिला होता.
मुंबई ः जिंकण्याची खात्री असेल तरच जागा मागा असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या महायुतीच्या बैठकीत दिला होता. मात्र तरीही महायुतीतील शिवेसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रस आपल्याला जास्तीत जागा मिळण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे महायुतीतील नाराजी नाट्यावर पडदा पडण्यास अजून बराच वेळ लागण्याची चिन्हे आहेत.
महायुतीतील जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी दिल्लीला रवाना होणार होते. दिल्लीमध्ये होणार्या बैठकीत जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, काही कारणास्तव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून ही बैठक रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी महाराष्ट्रातील नेते दिल्लीला जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मात्र, ही बैठक अचानक रद्द झाल्यामुळे नेमके शिजतेय काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महायुतीमध्ये 80 टक्के जागा वाटपाचा निर्णय झाला असून केवळ 20 टक्के जागांवर चर्चा करून येत्या दोन-तीन दिवसात निर्णय येईल असे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना सांगितले होते. त्या संदर्भातच दिल्ली येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, ही बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. आमचे जागावाटप जवळपास निश्चित झाले असून काही मोजक्या जागांवर चर्चा बाकी असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. आमच्यात फार ताणतणाव नाही, विरोधी पक्ष त्यांचे राजकारण कन्फ्युजनच्या आधारावर करत असल्याची टीका देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. महायुतीमध्ये जागा वाटपावरून नाराजी नाट्य सुरू असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे झालेल्या बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा झाली. मात्र, अंतिम निर्णय होऊ शकला नाही. राजधानीतही यावर तोडगा निघू शकलेला नाही.
COMMENTS