Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.योगेश भैय्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी रस्त्याचा प्रश्न लावला मार्गी

प्रभाग क्र.22 मधील राजमुद्रा प्रतिष्ठान, धांडे नगर (पश्चिम) च्या मुख्य रस्ता,नाली कामाला सुरुवात

बीड प्रतिनिधी - शहरात नगर पालिकेच्या माध्यमातून विविध भागात सिमेंट रस्ते नाली बांधकाम सुरू आहेत. दलित वस्ती योजने अंतर्गत कै.शिवाजीराव धांडे नगर

लाऊंज मध्ये प्रवेश नाकारल्याने तरुणांनी बाऊन्सरला केली बेदम मारहाण | LOK News 24
रिंकू सिंहच्या शॉटने खळ्ळ खट्याक प्रचंड ताकदीनं मारलेल्या सिक्सने फोडली काच
शाश्‍वत विकासाच्या दिशेने

बीड प्रतिनिधी – शहरात नगर पालिकेच्या माध्यमातून विविध भागात सिमेंट रस्ते नाली बांधकाम सुरू आहेत. दलित वस्ती योजने अंतर्गत कै.शिवाजीराव धांडे नगर भागातील राजमुद्रा प्रतिष्ठान, धांडे नगर (पश्चिम) चा मुख्य रस्ता, नाली बांधकामास डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली.
बीड शहरातील प्रभाग क्रमांक 22 मधील कै.शिवाजीराव धांडे नगर भागातील राजमुद्रा प्रतिष्ठान धांडे नगर (पश्चिम) चा मुख्य रस्ता, नाली बांधकामाला सुरुवात करण्यात आली. या रस्त्याला दोन शाळा आणि आठ कॉलनी जोडलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे. या कामाच्या ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांनी रस्ता, नाली चा प्रश्न सोडविल्याबद्दल छोटेखानी सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ.योगेश भैय्या यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर बोलताना म्हणाले की, राजमुद्रा प्रतिष्ठान, धांडे नगर पश्चिमचा मुख्य रस्ता आठ कॉलनी आणि द.बा.घुमरे आणि आय कॉन इंग्लिश स्कूल या दोन शाळेला जोडणारा रस्ता आहे. पावसाळ्यात शाळेत येणार्या लहान-लहान विद्यार्थांना आणि स्थानिक नागरिक आणि महिलांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता या रस्त्याचे काम सुरू होत असल्याने भविष्यात हा त्रास होणार नाही व शाळेतील विद्यार्थी आनंदाने शाळेत येतील. दलित वस्ती योजने अंतर्गत होणार्या सिमेंट रस्ता आणि नालीचे काम हे इतर सिमेंट रस्त्याच्या प्रमाणेच दर्जेदार होईल. आम्ही राजकारणात काम करताना नागरिकांना मूलभूत गरजा पुरविणे हे कर्तव्य समजूनच काम करत असतो. विकास कामे करताना एकाच वेळी सर्व कामे करता येत नाहीत. टप्प्या – टप्प्याने कामे होत असतात. शहराचा विस्तार हा अतिशय झपाट्याने होत आहे. त्यामुळे नगरपालिकेवर ताण पडतो आहे. हा परिसर वाढता भाग असल्यानं इथल्या लोकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी आणि कामे मंजूर करण्यासाठी शासन दरबारी सततचा पाठपुरावा सुरू आहे. माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर आणि डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शहराचा कायापालट होत आहे. भविष्यात देखील शासन दरबारी पाठपुरावा करून बीडकरांना मूलभूत सुविधा देण्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे सांगितले. या भागात विविध विकास कामे झाली आहेत. या भागातील विकास कामांसाठी मागच्या काळात मंजूर करून आणलेला निधी लोकप्रतिनिधींनी राजकीय द्वेषापोटी इतरत्र वळविल्यामुळे विकास कामे रखडली होती. मात्र आता ही कामे लवकरात लवकर पूर्ण होतील आणि स्थानिक नागरिकांच्या समस्या सुटतील. कै.शिवाजीराव धांडे नगर च्या मुख्य रस्त्याचे काम हे अतिशय दर्जेदार झाले आहे. परंतु रस्त्यालगतच्या मोठ्या नाल्याचे काम अद्याप पर्यंत पूर्ण झाले नाही. स्थानिक नागरिकांनी सहकार्य केल्यास या नाल्याचे काम देखील लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. स्थानिक नागरिकांनी कायमच आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला साथ दिली आहे. त्यामुळे तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. येणार्या काळात बीड शहरातील नागरिकांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांनी आश्वासन दिले. याप्रसंगी मा.नगरसेवक नरसिंग नाईकवाडे,विनोद मुळूक,गणेश वाघमारे, रवींद्र कदम,डॉ .शिवानंद क्षीरसागर, सुमित धांडे ,नामदेव घोडके, ज्ञानेश्वर कोकाटे, प्रा.प्रकाश नाईकवाडे, प्रकाश मोरे, प्रा.पी. आर.वाणी, अशोक थापा, अनिल राऊत,विशाल धांडे, मुकुंद वाघमारे, यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS