Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. विखेंनी आधी राहात्याचा विचार करावा नंतर जिल्ह्याचा

शरद पवार गटाचे रणजीत बोठे पाटील यांची टीका

राहाता ः नुकत्याच एका भाषणात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपण जिल्ह्याचा विकास करू असा दावा केला होता. मात्र आपल्या राहाता मतदारसंघातच श

पाथर्डी शेवगाव तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करा ः आदिनाथ देवढे
खिर्डी गणेश येथे शांतता समितीची बैठक उत्साहात
आम्ही ओबीसी उमेदवार देणार…तुम्ही?

राहाता ः नुकत्याच एका भाषणात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपण जिल्ह्याचा विकास करू असा दावा केला होता. मात्र आपल्या राहाता मतदारसंघातच शेकडो प्रश्‍न रोज उभे आहे त्यावर काम करण्याची गरज आहे.एकदा तालुका समृद्ध करा मग बाहेरचे तालुके सुधारा असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे (शरद पवार गटाचे) जिल्हा सरचिटणीस रणजित बोठे पाटील यांनी विखे पाटील यांना केला आहे.
निळवंडे चार्‍यांचे आणि पाण्याचे प्रश्‍न, अनेक तलाव भरले गेले नाही, रस्त्याची अवस्था न विचारलेली बरी, नगर मनमाड जणू काही तीन पिढ्यांची देणं आहे अशी समस्यांची जत्रा आधीच आपल्याकडे आहे. दुसर्‍यांची गाडी ओढायला जाताना आपली मात्र चाक गळून पडली आहे हे पाहणे गरजेचे आहे. पावसाचे अनियमितता असल्याने पाट पाण्याचे नियोजन सुजय विखे यांचे वडील पालकमंत्री असून देखील कोलमडले आहे. शेजारचे मतदारसंघ पाहून आपल्या मतदारसंघाची मात्र आता चिंता वाटू लागली आहे. तीन पिढ्यांची सत्ता असूनही विखे पाटील कुटुंबाने राहाता मतदारसंघात दैनंदिन प्रश्‍न देखील आजवर सोडवले नाहीत. वीज, पाणी, रस्ते, रोजगार हे साधे मूलभूत प्रश्‍न जर इतके वर्ष निकाली निघाले नसतील तर दुःखद आहे.निवडणूक आली की मग या प्रश्‍नांची सोडवणूक आम्ही कशी करणार याचे मोठे मोठे आश्‍वासने देण्याचे काम केले जाते.जिल्ह्यात काय विकास करायचा ते करायला जिल्ह्यातले मोठे नेते सक्षम आहे आपण सध्या निदान राहाता आणि शिर्डी परिसरात असणार्‍या समस्या डोळे उघडुन बघाव्या.अनेक गावांना बस उपलब्ध नाहीत, रस्ते धडाचे नाही त्यामुळे विद्यार्थी पालकांचे हाल होतात.फक्त भाषण बाजी करून विकास होणार नाही त्यासाठी जनतेचे प्रश्‍न आपण एवढे वर्ष का सोडवले नाही याचे देखील चिंतन त्यांनी करावे असे बोठे पाटील शेवटी म्हणाले आहे.

COMMENTS