Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. सुजय विखे यांना संगमनेर तालुका बंदीचा एकमुखी ठराव

संगमनेर :सुसंस्कृत राजकारणाची राज्याला दिशा देणार्‍या संगमनेर तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुजय विखे यांनी सभा घेऊन भडक वक्तव्य केली. यातूनच

पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास बिबट्या जेरबंद
शिर्डी येथे ‘महापशुधन एक्सपो’ चे २४ ते २६ मार्च दरम्यान आयोजन
देवळाली प्रवरात अकरावी विज्ञान शाखेच्या प्रश्नपञिका फुटल्या

संगमनेर :सुसंस्कृत राजकारणाची राज्याला दिशा देणार्‍या संगमनेर तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुजय विखे यांनी सभा घेऊन भडक वक्तव्य केली. यातूनच काही लोकांना प्रोत्साहन मिळाल्याने युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह महिला भगिनींविरुद्ध अत्यंत गलिच्छ भाषेत वक्तव्य करणार्‍या वसंत देशमुख व सुजय विखे यांना तातडीने अटक करा या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले याचबरोबर सुजय विखे यांना संगमनेर तालुका प्रवेश बंदी करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला.
घुलेवाडी येथील ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महिलांचा अपमान करणारे वसंत देशमुख व सुजय विखे यांना तातडीने अटक करावा या मागणीसाठी प्रचंड मोठे निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मा आ.डॉ. सुधीर तांबे, राहता काँग्रेसच्या उमेदवार सौ प्रभावती ताई घोगरे, हेमंत ओगले, सौ दुर्गाताई तांबे, डॉ जयश्रीताई थोरात,उत्कर्षा रुपवते, इंद्रजीत भाऊ थोरात, सचिन गुजर, कारण ससाने, सौ दिपाली ससाने, राहुरीचे बाळासाहेब आढाव, बाबा ओहोळ, इंद्रजीत भाऊ थोरात, विश्‍वासराव मुर्तडक, आरपीआय नेते बाळासाहेब गायकवाड, राजू खरात, सचिन चौगुले, अमर कतारी, अशोक सातपुते, संजय फड यांच्यासह संगमनेर तालुक्यातील महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी युवक कार्यकर्ते महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. जयश्री थोरात यांच्या बद्दल धांदरफळ येथील सभेत अध्यक्ष असलेले व वय 80 च्या दरम्यान असलेले वसंत देशमुख यांनी अत्यंत वाईट असे बेताल वक्तव्य केले. यानंतर सुजय विखे यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता पुन्हा टीका केली. ही टीका सुरू असताना संगमनेर तालुक्यात प्रचंड मोठी संतापाची लाट निर्माण झाली हजारो महिला व कार्यकर्त जमा झाले. या सर्वांनी घुलेवाडी येथील ग्रामीण पोलीस स्टेशनवर मोर्चा नेला व दोषींना तातडीने अटक करावी अशी मागणी केली परंतु पोलीस प्रशासनावर दबाव असल्याने रात्रभर हजारो लोक पोलीस स्टेशन समोर थांबूनही पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता. त्यानंतर सकाळी चार गुन्हे दाखल करण्यात आले. या आरोपींना अटक करावी याकरता संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावांमधून शेकडो नागरिक घुलेवाडी पोलीस तालुका समोर जमा झाले. या सर्वांनी आरोपींना तातडीने अटक करावे अशी जोरदार मागणी केली. यावेळी बोलताना खासदार वाकचौरे म्हणाले की, थोरात परिवार हा सुसंस्कृत परिवार आहे या परिवाराचा सर्व राज्य आदर करतो आहे. परंतु वाईट प्रवृत्ती काय असते ती आता संगमनेर ने नव्हे तर जिल्ह्याने अनुभवली आहे. महायुतीच्या उमेदवारांचा डिपॉझिट जप्त करून सर्वांनी निषेध करावा असे आव्हान त्यांनी केले. तर प्रभावती ताई घोगरे म्हणाल्या की, ही वाईट संस्कृती राहता तालुक्याला माहित आहे. विरोधी बोलले कि, तंगड्या तोडल्या जातात. महिलांबद्दल इतके वाईट बोलताना यांना लाज कशी वाटत नाही. दक्षिण नगर मध्ये जनतेने यांना का पराभूत केले हे आता लोकांना कळले आहे. अशा प्रवृत्तीला साथ देणारे सुद्धा वाईट आहेत. या सर्वांचा एकजुटीने बंदोबस्त करा. आमदार बाळासाहेब थोरात हे राज्यांमध्ये जिल्ह्याचे नाव मोठं करत आहे. ते राज्य सांभाळतील आपण तालुका आणि जिल्हा सांभाळून अशा वाईट प्रवृत्तींना वेळच रोखु असे आवाहन त्यांनी केले. डॉ सुधीर तांबे म्हणाले की, सुसंस्कृत राजकारण ही आपली परंपरा आहे. मात्र कुणी अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावत असेल तर संगमनेर तालुका हे सहन करणार नाही. लोकशाही आहे मते मांडण्याचा अधिकार आहे मात्र शिर्डी मतदारसंघातील दडपशाही आणि हुकूमशाही येथे चालणार नाही. संगमनेर चा नागरिक यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. यावेळी दुर्गाताई तांबे, सचिन गुजर, हेमंत ओगले, उत्कर्ष रूपवते, सचिन दिघे, सचिन चौगुले, बाळासाहेब गायकवाड विश्‍वासराव मुर्तडक, सुरेश थोरात, निर्मलाताई गुंजाळ, सौ उज्वला देशमाने, आदींसह विविध नागरिकांनी या घटनेचा निषेध केला. यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले की कालची घटना ही अत्यंत दुर्दैवी असून आरोपींना पकडण्यासाठी 12 पथके नियुक्त केली आहे. सर्व जण भावनेचा आदर करून आरोपीवर योग्य कारवाई केली जाईल असे आश्‍वासन दिले.

संगमनेर तालुक्यासह राज्यभरात संतापाची लाट
संगमनेर तालुका हा सुसंस्कृत आहे मात्र येथे येऊन सातत्याने भडकाऊ भाषणे करून समाजामध्ये द्वेष पसरवणार्‍या आणि महिलांचा अवमान करणार्‍या सुजय विखे यांना संगमनेर तालुक्यात कोणत्याही गावात प्रवेश दिला जाणार नाही याचबरोबर त्यांच्या समर्थकांचाही प्रवेश दिला जाणार नाही असा एकमुखी ठराव संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावांमधील नागरिक व महिलांनी मोठ्या टाळ्यांच्या गजरात केला असून या घटनेचे राज्यभर पडसाद उमटल्याने जिल्ह्यामधूनही सुजय विखे व त्यांच्या पदाधिकार्‍यांचा निषेध होत आहे.

COMMENTS