देवळाली प्रवरा ः राहुरी फॅक्टरी येथील डॉ. भागवत आनंदा लहारे हे गेल्या दोन दिवसा पासून बेपत्ता होते. सोमवारी दुपारी डाँ.लहारे यांचा मृतदेह बेलापू

देवळाली प्रवरा ः राहुरी फॅक्टरी येथील डॉ. भागवत आनंदा लहारे हे गेल्या दोन दिवसा पासून बेपत्ता होते. सोमवारी दुपारी डाँ.लहारे यांचा मृतदेह बेलापूर येथे आढळून आला.मृतदेहा शेजारीच विषारी औषधाची बाटली आढळल्याने डाँ.लहारे यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शी स्पष्ट झाले आहे.आत्महत्याचे कारण माञ समजू शकले नाही.
डॉ.भागवत लहारे हे रविवार पासून बेपत्ता असल्याची चर्चा होती.घरच्यांनी नातेवाईक यांच्यांकडे शोध घेतला. परंतू मिळून आले नाही. डाँक्टर यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. सोमवारी दुपारी बेलापूर येथील नवले वस्ती परिसरातील पाण्याची टाकी रोडला एका ओढ्याजवळ डॉ. लहारे यांचा मृतदेह आढळून आला. डॉ. लहारे यांच्या मृतदेहाशेजारी विषारी औषधाची बाटली मिळून आल्याने प्रथमदर्शी डॉ. लहारे यांनी विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केली असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी वर्तविला आहे. घटनास्थळी श्रीरामपूर शहर पोलिसठाण्या अंतर्गत बेलापुर औट पोष्टचे पोलिस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. डॉ. लहारे यांनी विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केली. आत्महत्या मागचे कारण माञ समजू शकले नाही.
COMMENTS