Homeताज्या बातम्यादेश

डॉ. सुधीर तांबे यांचे काँग्रेस मधून निलंबन

चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कारवाई

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः महाराष्ट्रातील नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये काँगे्रसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देऊन देखील त्यांनी अर्ज दाखल न करता मा

जगभरात मंकीपॉक्सने वाढवली चिंता
तीन दिवसानंतर अखेर गवा सांगली शहरात दाखल
या गावातील वाळुमाफिया, महसुल व पोलीस प्रशासनाच्या संगनमताने होतेय वाळू तस्करी | LOKNews24

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः महाराष्ट्रातील नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये काँगे्रसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देऊन देखील त्यांनी अर्ज दाखल न करता माघार घेतली. त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत आणि दुसरा अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले आहेत. यामुळे काँगे्रसमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत पक्षाच्या हायकमांडकडे तक्रार दाखल केली होती. अखेर रविवारी काँगे्रस पक्षातून सुधीर तांबे यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्याने काँग्रेस पक्षाने ही कारवाई केली असल्याचे पत्र जारी करण्यात आले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे  पक्षातून निलंबित असणार आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. सुधीर तांबे यांची अधिकृत घोषणा झाल्यानंतरही त्यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज न भरता सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने हाय कमांडला दिली होती. तसेच कारवाईचीही मागणी केली होती. त्यानंतर अखिल भारतीय काँगे्रस कमिटीचे सरचिटणीस तारीक अन्वर यांनी डॉ. तांबे यांच्यावर निलंबनांची कारवाई करण्यात येत असल्याचे पत्र जारी केले आहे. त्यामुळे तांबे पिता-पुत्रासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शिवाय काँगे्रस पक्ष या निवडणुकीत कोणती भूमिका घेतो, ते देखील अद्याप गुलदस्त्यात आहे. शिवाय भाजपने देखील अजून कुणालाही पाठिंबा व्यक्त केलेला नाही. त्यामुळे नाशिक पदवीधरची निवडणुकीतील चित्र स्पष्ट होण्यासाठी अजून आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मी काँगे्रस पक्षात कार्यरत आहे. शिवाय तीनवेळ आमदार देखील राहिलो आहे. त्यामुळे कधीही मी काँगे्रसच्या धोरणाविरोधात भूमिका घेतलेली नाही. मात्र माझ्या संदर्भात काँगे्रस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्‍वास आहे.
डॉ. सुधीर तांबे, आमदार, विधान परिषद

COMMENTS