Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.सुजित हजारे मातृभूमी प्रतिष्ठानकडून सन्मानित

बीड प्रतिनिधी - बीड येथील आमचे मित्र व मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार उत्तम हजारे यांचा मुलगा सुजित हजारे याने एमबीबीएस वैद्यकीय फायनल परीक्षेत घवघवी

प्रामाणिकपणा व इमानदारी हीच आदिवासी समाजाची कवच कुंडले ः पो.नि.देसले
गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी 15 सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावा
 एक करोड सेल्फी विथ लाभार्थी योजनेचा शुभारंभ प्रथम महाराष्ट्रातुन – भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ

बीड प्रतिनिधी – बीड येथील आमचे मित्र व मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार उत्तम हजारे यांचा मुलगा सुजित हजारे याने एमबीबीएस वैद्यकीय फायनल परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल दि सात एप्रिल 2023 रोजी त्यांच्या निवासस्थानी जाऊन मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा डॉ संजय तांदळे व लक्ष्मण चाटे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला सुजित हजारे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बीड येथील संस्कार विद्यालय तर माध्यमिक शिक्षण बलभीम महाविद्यालय येथे झाले आहे इयत्ता बारावी विज्ञान च्या परीक्षेत तो बलभीम महाविद्यालयातून सर्वप्रथम आला होता नीट परीक्षेत उतुंग यश मिळवल्यानंतर अहमदनगर येथील पद्मश्री डॉ विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस साठी प्रथम वर्षाला नंबर लागला होता त्यानंतर शासकीय कोट्यातून लातूर येथील शासकीय वैद्यकीय कॉलेजला नंबर लागला एमबीबीएस च्या सर्वच वर्षाच्या परीक्षेत तो कॉलेजमध्ये टॉपर राहिला आहे डॉ सुजित हजारे यांच्या या यशाबद्दल मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे हार्दिक  अभिनंदन व पुढील शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा.

COMMENTS