Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार

नवी दिल्ली : ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरुप’ या समीक्षात्मक पुस्तकासाठी बुधवारी यंदाचा साहित्य अकदामी पुरस्

ड्रेनेजच्या गॅसने चक्कर येऊन मजुराचा मृत्यू
महिला सरपंचानी नियमांची माहिती व अभ्यासतून गावांचा सर्वागींण विकास करावा – पालकमंत्री सुभाष देसाई
संभाजीनगरमध्ये दानवे विरुद्ध खैरे दिलजमाई

नवी दिल्ली : ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरुप’ या समीक्षात्मक पुस्तकासाठी बुधवारी यंदाचा साहित्य अकदामी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांचे समीक्षात्मक पुस्तक विंदांचे गद्यरुप या पुस्तकासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यंदा 21 भाषांमधील साहित्यिकांना हा पुरस्कार जाहीर झाला. अकादमीचे सचिव, के. श्रीनिवासराव यांनी साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नाव लौकिक असणार्‍या साहित्य अकादमीने, येथील कॉपर्निकसमार्ग स्थित साहित्य अकादमीच्या रविंद्र सभागृहात वर्ष 2024 साठी साहित्य पुरस्कारांची घोषणा केली.
अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील 21 प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी साहित्य पुरस्कारांची निवड व घोषणा करण्यात आली. कोंकणी भाषेचा पुरस्कार मुकेश थली यांच्या रंगतरंग या लेखसंग्रहाला मिळाला. आपल्याला मिळालेल्या पुरस्कारामुळे आंनद झाला असून, आतापर्यंतचा हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार असल्याची भावना रसाळ यांनी व्यक्त केली. पुरस्कार मिळाल्यानंतर सुधीर रसाळ यांनी त्यांच्या भावना व्यक्त करत म्हटले की, हा पुरस्कार भारतात सर्वात सन्मानाचा पुरस्कार आहे. माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त समाधान या पुस्काराने मिळवून दिले आहे. मोठ मोठे समीक्षक, विचारवंत यांना या पुरस्कार देण्यात आला आहे. तेव्हा अशा मोठ्या माणसांसोबत आपले नाव जोडले गेले याचा आनंद आहे. साहित्य अकादमीचा पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. यंदाच्या वर्षासाठी जी पुस्तकं पाठवण्यात आली होती, ती सगळीच तुल्यबळ होती. नदिष्ठ, भुरा, बौन हा सौमित्र यांचा कवितासंग्रह होता, अभिराम भडकमकरांच्या इन्शाअल्लाह ही कांदबरी होती, अशा 12 पुस्तकांमधून विंदांचे जे समीक्षात्मक पुस्तक आहे, त्याची निवड करण्यात आली आहे. सुधीर रसाळ हे समीक्षकांमधले फार मोठे नाव आहे. त्यामुळे त्यांना मिळालेला हा पुरस्कार अत्यंत योग्य असल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्या जात आहेत.

डॉ.सुधीर रसाळ यांच्या विषयी
डॉ. सुधीर रसाळ हे मराठीतील मान्यवर समीक्षक आणि लेखक आहेत. त्यांनी 1956 पासून मराठी वाङ्मयाची समीक्षा करत उल्लेखनीय योगदान दिले आहे. दिल्लीच्या साहित्य अकादमीमध्ये मराठीचे प्रतिनिधित्व करणारे रसाळ हे औरंगाबाद विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागाचे 1990 ते 1993 या काळात प्रमुख होते. साहित्य लेखन, समीक्षा आणि संपादन या क्षेत्रांत त्यांचा हातखंडा आहे. डॉ.रसाळ यांच्या महत्त्वाच्या पुस्तकांमध्ये कविता आणि प्रतिमा, कवितानिरूपणे, मर्ढेकरांची कविता : आकलन आणि विश्‍लेषण, ना.घ. देशपांडे यांची कविता यांसारख्या ग्रंथांचा समावेश आहे. त्यांचे लेखन वाङ्मयीन जाणिवा, शैली, आणि संस्कृती यावर विशेष प्रकाश टाकते.

विंदांचे गद्यरुप या पुस्तकाविषयी
मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांच्या विंदाचे गद्यरुप या समीक्षात्मक पुस्तकाला प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठी समीक्षेच्या क्षेत्रात सैद्धांतिक समीक्षेचा अभाव अधोरेखित करणारे हे पुस्तक साहित्य आणि वाङ्मय विषयक अनेक प्रश्‍नांना समर्थ उत्तरे देते. डॉ. सुधीर रसाळ यांनी त्यांच्या समीक्षेत वाङ्मयकृतीच्या अस्तित्वाचा, तिच्या घटकांच्या परस्पर संबंधाचा आणि तिच्या मूल्यमापनासाठी योग्य निकष तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी समीक्षेच्या दीडशे वर्षांच्या इतिहासात काही निवडक समीक्षकांनीच अशा प्रकारचे सैद्धांतिक अभ्यास सादर केले आहेत. डॉ.रसाळ यांनी या पुस्तकातून पहिल्यांदाच विंदांच्या काव्यशास्त्राची सैध्दांतिक समीक्षा मांडली आहे.

COMMENTS