कोपरगाव तालुका ः सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणार्या कोपरगाव येथील शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे प्रतिष्ठान व रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या मा
कोपरगाव तालुका ः सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणार्या कोपरगाव येथील शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे प्रतिष्ठान व रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, सहकार, शेती, जलसिंचन व पर्यावरण आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व समाजासाठी अविरतपणे झटणार्या आदर्श व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करून त्यांचे कार्य समाजापुढे आणण्याची व त्यांच्या गौरवाची परंपरा कायम ठेवत यंदाचा शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे स्मृती पुरस्कार प्रख्यात पर्यावरण तज्ज्ञ, ग्रीन मुंबई मिशनचे संस्थापक डॉ. सुभजीत मुखर्जी यांना नुकताच जाहीर झाला आहे.
मराठी माणूस हा परंपरांचा आदर करणारा आहे. त्यांना जपणारा आहे आणि त्यांची कास धरूनच आधुनिकतेकडे झेप घेणारा देखील आहे. त्याच परंपरेचा मान ठेवत यावर्षीच्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी प्रथमच अमराठी व्यक्तीची निवड करण्यात आली आहे. आणि त्याला कारणही तसेच आहे. पर्यावरणीय व्यवस्थेत असंतुलितपणा निर्माण होऊन मानवाच्या अविचारी वागण्यामुळे जल, हवा, ध्वनी भूप्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. औद्योगिक व रासायनिक दूषितिकरणामुळे विविध प्रकारचे आजार वाढत आहेत. याच गोष्टीवर डॉ. सुभजीत मुखर्जी यांनी अतिशय मूलभूत संशोधन करून हा निष्कर्ष काढला की, जैववैद्यकीय कचरा जो मातीमध्ये जोडला जातो. त्याचा परिणाम मातीच्या वनस्पती आणि जीवजंतूवर होतो. म्हणून पावसाच्या पाण्यातून शहरीभागातील भूजल पातळी वाढवण्याकरिता नागरिकांसाठी कल्याणकारी योजना राबवणारे प्रख्यात पर्यावरण तज्ञ डॉ. सुभजीत मुखर्जी यांचे अतुलनीय योगदान आहे. सदर पुरस्काराचे वितरण येत्या शुक्रवार 19 जानेवारी रोजी होणार्या रेनबो स्कूलच्या दिमाखदार स्नेहसंमेलन सोहळ्यात सायंकाळी 4 वाजता साई सृष्टी लॉन्स, शिर्डी- कोपरगाव रोड, तीन चारी येथे होणारआहे. तरी तालुक्यातील व पंचक्रोशीतील बहुसंख्य नागरिकांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यकारी संचालक व प्राचार्य आकाश नागरे यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी विश्वभारती रूरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कांतीलाल अग्रवाल, विश्वस्त संजय नागरे, मनोज अग्रवाल, आनंद दगडे, रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे व्यवस्थापकीय समितीचे सदस्य, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येंने उपस्थित राहणार आहे.
COMMENTS