Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. सुरेश साबळे यांचे निलंबन रद्द करा नाहीतर मनसे स्टाईल आंदोलन करू- वर्षाताई जगदाळे

बीड प्रतिनिधी - जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांचे कार्य चांगल्या पद्धतीने सुरू असताना एका चुकीच्या निर्णयामुळे जिल्हाभरात राज्य शासना

महाराष्ट्र कुस्ती संघातील वाद पुन्हा चव्हाटयावर
प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेंतर्गत स्टेट बँकेकडून दोन लाखांचा धनादेश प्रदान
दिवंगत भास्कर मोकळे यांना अशोक हिंगे यांच्या वतीने अभिवादन

बीड प्रतिनिधी – जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांचे कार्य चांगल्या पद्धतीने सुरू असताना एका चुकीच्या निर्णयामुळे जिल्हाभरात राज्य शासनाच्या आरोग्य विभागावर जिल्ह्यातील जनता संताप व्यक्त करत आहे. चांगले अधिकारी बीड जिल्ह्यात येण्यास इच्छुक नसतात यातच आरोग्य विभागात काम करत असताना डॉक्टर सुरेश साबळे यांनी प्रत्येक घटकाला न्याय देत जिल्हा रुग्णालयात भगीरथ बदल घडवला, अवघड शस्त्रक्रिया, जिल्हा रुग्णालयातील ढासळलेला कारभार रूळावर आणला, ज्या चुकीची शिक्षा त्यांना देण्यात आली, त्या कंत्राटी भरती मध्ये डॉक्टर साबळे यांचा दूरचा संबंध नाही मग त्यांचे निलंबन कशासाठी? जिल्ह्यातील एका गुटखा व पत्त्याचा क्लब चालवणार्‍या नेत्याच्या शिफारशीमुळे डॉक्टर साबळे सारख्या चांगल्या अधिकारीचा बळी देण्यास सरकार तयार झाले, डॉक्टर सुरेश साबळे यांचे निलंबन तात्काळ रद्द करत पुन्हा जिल्हा रुग्णालयाचा कारभार त्यांच्या हाती देण्यात यावा नसता महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल असा खणखणीत इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांनी प्रशासनाला दिला आहे.

COMMENTS