डॉ. गंगाधर पानतावणे यांच्यानंतर इलायाराजा कडून पुनरावृत्ती !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

डॉ. गंगाधर पानतावणे यांच्यानंतर इलायाराजा कडून पुनरावृत्ती !

 दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार आणि गायक असणारे इलयाराजा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नरेंद्र मोदी यांच्यात केलेल्या तुलनेने

राष्ट्रवादीचा सरपंच चंदन तस्करांच्या टोळीत सक्रिय… पोलिसांची कारवाई
सहा तासाच्या शस्त्रक्रियेनंतर काढली दीड किलोची गाठ
केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांची दिवाळी गोड ! पगारात झाली इतकी वाढ

 दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार आणि गायक असणारे इलयाराजा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नरेंद्र मोदी यांच्यात केलेल्या तुलनेने त्यांच्यावर देशभरातून टीकेची झोड उठली आहे.  ब्लूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशन नावाच्या  तथाकथित एका संस्थेद्वारे प्रकाशित झालेले “आंबेडकर अँड मोदी रिफॉर्मर, आयडियाज, परफार्मर्स, इम्प्लिमेंटेशन” या पुस्तकात इलयाराजा यांनी केलेली ही तुलना देशातील बहुसंख्य लोकांच्या टीकेस पात्र झाली आहे. मात्र यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी इलयाराजा यांना पाठिंबा देण्याची चढाओढ दाखवली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या बरोबर संघ – भाजपच्या नेत्यांची तुलना करण्याची ही विकृत परंपरा १९९१ मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केली होती. त्यावेळी त्यांनी ‘डॉ. आंबेडकर ते हेडगेवार’ अशाप्रकारचा एक विशेषांक काढून संघाच्या नेत्याबरोबर डॉ. आंबेडकर यांची तुलना करण्याचा प्रयत्न केला होता. आणि या अंकात डॉक्टर गंगाधर पानतावणे आणि ताराचंद खांडेकर यांच्यासारख्या दलित लेखकांनी आपला सहभाग नोंदवला होता. गंगाधर पानतावणे हे अस्मितादर्श नावाचे नियतकालीक चालवित असताना त्यांनी अनेक संमेलनं भरवली. परंतु ते आरएसएसचे प्यादे आहेत, अशा प्रकारची टीकाही त्यांच्या हयातीत आणि त्यांच्या मृत्यूनंतर ही करण्यात आली. जवळपास त्याच पद्धतीचा पुन्हा एकदा अवलंब केला गेला आहे. इलयाराजा हे तमिळ चित्रपटसृष्टीतील एक बडे प्रस्थ असले तरी ते मुळतः दलित आहेत. ज्यावेळी डॉ. गंगाधर पानतावणे यांनी डॉ. आंबेडकर ते हेडगेवार’ या विशेषांकात लेख लिहिला होता, ते लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे थेट आरएसएसशी  संबंध होते, किंबहुना ते आरएसएसच्या सूचनेप्रमाणे कार्य करत होते, अशा प्रकारची टीका  कार्यकर्ते, नेते आणि विचारवंतांनी यापूर्वीच केलेली आहे. तसाच प्रकार पुन्हा इलयाराजा यांच्या माध्यमातून घडविण्यात आलेला आहे. इलयाराजा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नरेंद्र मोदी यांच्यात केलेली तुलना हा त्यांचा उस्फुर्त विचारांचा परिपाक नसून त्यांचे थेट आरएसएसशी संबंध असल्याचे ते द्योतक आहे. इलयाराजा यांनी लिहिलेल्या या लेखाच्या संदर्भात डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या कृतीचे स्मरण देणे, याचा अर्थ एवढाच आहे की, अशा प्रकारची कृती आपल्या हस्तकांमार्फत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच घडवून आणत असतो आणि त्यामुळे त्यात नवीन असे काही नाही. या लेखाचे पडसाद देशभरातील बहुजन समाजातून ज्या पद्धतीने उमटले आहेत, त्याचा परिणाम काय झाला याची प्रतिक्रिया म्हणजे इलयाराजा यांचा मुलगा युवान शंकर राजा यांची सोशल सोशल मीडियावरील पोस्ट ही महत्त्वाची ठरतेय. युवान याने, ‘आपण काळे असून आपल्याला द्रविड असल्याचा अभिमान आहे’, असे म्हटले आहे. याचा एक सरळ अर्थ असा होतो की इलयाराजा यांच्या मुलालाच त्यांच्या लेखातील तपशील मान्य नाही किंबहुना त्या तपशीलाशी त्यांचे मतभेद आहेत, असे यातून स्पष्ट होते. मात्र, युवानच्या या प्रतिक्रियेवर भाजपचे तमिळनाडू अध्यक्ष  अण्णामलाइ यांनी मात्र अतिशय वर्णवादी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तमिळनाडूचे डीएमके आणि एडीएमके या दोन्ही पक्षांनी या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना, अशा प्रकारच्या तुलनेला आमची सहमती नाही, हे स्पष्टपणे म्हटले आहे. इलयाराजा यांनी हा लेख का लिहिला असावा, असा प्रश्न जेव्हा पडतो, तेव्हा तमिळनाडूतील ब्राह्मणेतर एकजुटीला तडा जावा यासाठी हा डावपेच केला गेला असावा, हे स्पष्ट होते. एखाद्या दलित व्यक्ती, विचारवंत, लेखक किंवा कलाकार यांच्याकडून संघ किंवा भाजपच्या व्यक्तीची तुलना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर करण्याची ही संकल्पना  तीस वर्षानंतर पुन्हा करण्यात आली. याचा अर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक तत्त्वज्ञानाला पुरून उरेल इतकी वैचारिक ताकद संघ-भाजपाच्या विचारात नाही, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे!

COMMENTS